भोपाळ, 27 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) उज्जेनमध्ये एका बलात्कार पीडितेने आपल्या दीड वर्षांच्या मुलीला घराबाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यापूर्वी तिने बाळाला लाटण्याने मारहाण केली आणि जमिनीवर आपटलं. लहानचा आरडाओरडा करीत राहिला, मात्र आईचं हृदय पिळवटूनन निघालं नाही. यानंतर तिने बाळाला एका हातात उचलून दरवाज्याच्या बाहेर फेकून दिलं. ही घटना उज्जेन शहरापासून 45 किमी दूर बडनगर स्थित जुनाशहरची आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओही समोर आला आहे. VIDEO च्या आधारावर चाइल्ड लाइनने कारवाई केली आहे. चाइल्ड लाइनच्या टीमने आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली. त्यानुसार महिला सतत मुलीला क्रूरपणे मारहाण करीत होती. महिलेचं कृत्य समोर आल्यानंतर चाइल्ड लाइनने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने मुलीला फार लागलं नाही. चाइल्ड टीमने कारवाईनंतर बाळाला मातृछाया संस्थेच्या स्वाधीन केलं आहे. आरोपीला महिला पोलिसांकडे देण्यात आलं आहे. हे ही वाचा- पत्नीला पाहून पती दुकानातूनच फरार; प्रेयसीला जबर मारहाण, गुप्तांगातही भरली मिरची दीड वर्षांपूर्वी झाला होता बलात्कार… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर दीड वर्षांपूर्वी चरक रुग्णालयात बलात्कार झाला होता. तिला जबाबासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र हजर न राहिल्याने कोर्टाने तिचा अटकेचा वॉरंट जारी केला होता. विशेष म्हणजे हे बाळ महिलेच्या पतीचं असल्याचंही स्पष्ट झालं आहे. मात्र बाल कल्याण समिनींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.