JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Pune: पुणे विमानतळावर 3 हजार हिरे जप्त, हिऱ्यांची किंमत तब्बल 48 लाख रुपये

Pune: पुणे विमानतळावर 3 हजार हिरे जप्त, हिऱ्यांची किंमत तब्बल 48 लाख रुपये

Pune Airport news: पुणे विमानतळावर कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळावरुन तब्बल 3 हजार हिरे जप्त करण्यात आले आहेत.

जाहिरात

Pune Airport (File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 मार्च : पुणे विमानतळावर (Pune airport) एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (Air Intelligence unit of Pune Customs department) केलेल्या कारवाईत तब्बल 3 हजार हिरे जप्त (3000 diamonds seized) केले आहेत. विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाच्या तपासणीत हे हिरे आढळून आले आहेत. जप्त केलेल्या हिऱ्यांची किंमत तब्बल 48 लाख 66 हजार इतकी आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या व्यक्तीकडे हे 3 हजार हिरे आढळून आले आहेत तो व्यक्ती शारजाह येथून आला होता. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर या व्यक्तीच्या तपासणीत हिरे आढळून आले. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शाहजाह येथून हिऱ्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती एअर इंटेजिजन्स युनिट, पुणे विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी आपला सापळा रचला होता. पुणे विमानतळावर त्यानुसार, सर्व प्रवाशांची तपासणी सुद्धा सुरू होती. ज्या व्यक्तीकडे हे 3 हजार हिरे आढळून आले आहेत त्यांची बाजारभावानुसार एकूण किंमत 48 लाख 66 हजार इतकी आहे. हे हिरे 75 कॅरेट वजनाचे असल्याचं तपासात समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने हे हिरे आपल्या सामानात लपवून ठेवले होते. या प्रकरणी आता आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. वाचा :  “पुणे विमानतळ ही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट! माहिती सर्वांना आहे, पण, करत काहीच नाही” पाषाण टेकडीवर तरुण-तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या पाषाण टेकडीवर सायंकाळच्या सुमारास अनेकजण फिरायला जातात. यामध्ये लहान लेकरं, विवाहित जोडपे, महाविद्यालयातील तरुण-तरुणी आणि प्रेमीयुगुल याठिकाणी फिरायला जात असतात. पण सायंकाळी उशिरा टेकडीवर गेल्यानंतर संबंधित जोडप्यांसोबत गुन्हेगारी कृत्य घडल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. शुक्रवारी रात्री याठिकाणी फिरायला गेलेल्या एका तरुण-तरुणीसोबत धक्कादायक कृत्य घडलं आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास संबंधित तरुण-तरुणी टेकडीवर एकेठिकाणी बसले असताना, त्याठिकाणी आलेल्या तीन जणांनी त्यांना दमदाटी आणि मारहाण करत त्यांच्याकडून 76 हजार रुपये लुटले आहेत. आरोपींनी ‘फोन पे’ द्वारे पैसे ट्रान्सफर करून घेतले आहेत. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत या दोघांना मारहाण केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या