JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Pune Crime News : नववर्षाच्या पहिल्यााच दिवशी गुंडांचा उच्छाद, गाड्यांची तोडफोड, पुण्यात चाललंय काय?

Pune Crime News : नववर्षाच्या पहिल्यााच दिवशी गुंडांचा उच्छाद, गाड्यांची तोडफोड, पुण्यात चाललंय काय?

पुण्यात सर्वसामान्य नागरिकात दहशत निर्माण करण्याचा उद्देशाने गुंडांनी 20 ते 25 चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 01 जानेवारी : मागच्या दोन दिवसांपूर्वी पुण्यात दहशत माजवण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवड गुंडांच्या दहशतीने हदरलं आहे. सर्वसामान्य नागरिकात दहशत निर्माण करण्याचा उद्देशाने गुंडांनी 20 ते 25 चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

वाकड आणि सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही तोडफोड केल्या गेलीय ज्यामध्ये ऑटो रिक्षा आणि चार चाकी वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. या वाहनांची मोठी तोडफोड करण्यात आली आहे. ऑटो रिक्षातून आलेल्या गाव गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन तसेच सिमेंटच्या गट्टूने मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली आहे.

हे ही वाचा :  पुन्हा शाईफेकीची धमकी, चंद्रकांत पाटलांचा दावा, घरूनच केलं भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन

संबंधित बातम्या

31 डिसेंबरच्या मध्यरात्री पिंपरी चिंचवड पोलीस मोठ्या प्रमाणात गस्तीवर होते. असं असताना देखील गुंडांच्या टोळक्यानी पिंपळे सौदागरसारख्या स्मार्ट सिटी भागामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्यामुळे वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील आणि सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत.

वाकड पोलीस आणि सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पोलिसांची गस्त कमी पडल्यामुळे गावंगुडांनी आमच्या वाहनांची तोडफोड केली अस या भागातील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जाहिरात

पुण्यात गुन्हेगारीकडे वळतय का?

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तसेच पुणे शहरामध्ये दहशत वाजवण्याचा प्रयत्न राजरोसपणे सुरू आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली.

जाहिरात

हे ही वाचा :  सराईत गुन्हेगारांचा कोयत्याने नागरिकांवर हल्ला; पोलिसांनी पाठलाग केला अन्.., पुण्यातील घटनेचा VIDEO

तसेच परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखविली जात होती. यामुळे वाहनधारक स्तब्ध झाले होते. अखेर पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या दोघा गुंडांना चांगलाच चोप दिला. हातात कोयता घेऊन पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडलं.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या