JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Pune Crime : चारित्र्यावर संशय, पत्नीचा चिरला गळा, पुण्यातील भाजी मंडईतली थरारक घटना

Pune Crime : चारित्र्यावर संशय, पत्नीचा चिरला गळा, पुण्यातील भाजी मंडईतली थरारक घटना

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा कटरने गळा चिरून पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 नोव्हेंबर : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही महिन्यांपासून खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पुणे शहर गुन्हेगारीच्या लिस्टमध्ये वर येत आहे. पुण्यात गुंडगिरीतून जोरदार गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता धक्कादायक माहितीसमोर आली आहे. चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा कटरने गळा चिरून पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या वडगाव शेरी भागात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कटरने गळा चिरल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर शवरप्पा मेनसे (वय 30, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) असे त्याचे नाव आहे.

हे ही वाचा :  नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, ईडीने गोठवली 80 बँक खाती

संबंधित बातम्या

याप्रकरणी पत्नी यल्लवा मेनसे (वय 30, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवशंकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर हा वाहनचालक म्हणून काम करतो आहे. त्याची पत्नी हाउसकीपिंगचे काम करते. शिवशंकर याचे दुसर्‍या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. यल्लवा तीन वर्षांपासून त्याच्यापासून वेगळ्या राहतात. शिवशंकर याने पत्नीला बुधवारी जेवणाचा डबा घेऊन वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात बोलावले होते. तेथे तो त्याची मिनी बस घेऊन थांबला होता.

हे ही वाचा :  आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी; जाणून घ्या कशी असते या टेस्टची प्रक्रिया?

जाहिरात

यावेळी बोलण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला गाडीत बोलावले. पत्नीसोबत वाद घालून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तू मोबाईलवर चांगले स्टेटस ठेवतेस, असे सांगून धारदार लोखंडी कटरने तिच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर गाडी चालू करून पळ काढला. प्रसंगावधान राखत पत्नीने चालत्या गाडीतून उडी मारली. तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तपास पोलिस उपनिरीक्षक कुमरे करीत आहेत

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या