नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : सीआर पार्कमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्याच्या घरी एक लेटर आणि पेन ड्राइव्ह सोडून छमकी देण्यात आली. या लेटरमध्ये खंडणी मागणाऱ्या लिहिलं की, तुझ्या गर्लफ्रेंडसोबतचे काही व्हिडीओ आमच्याकडे आहेत. जर पैसे दिले नाही तर हे व्हिडीओ व्हायरल (Private Video Viral) करण्यात येतील. यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास करीत आरोपीला पकडलं. जेव्हा आरोपीचं नाव समोर आलं तेव्हा तरुणाला जबर धक्काच बसला. कारण ही व्यक्ती दुसरी तिसरी नसून पीडितेचा मित्र आहे. हा आरोपी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. गेटवर ठेवलं होतं पेन ड्राइव्ह आणि लेटर साऊथ दिल्लीचे डिसीपी अतुल ठाकूर यांनी सांगितलं की, अटक केलेल्या आरोपीचं नाव समीर आहे. 31 वर्षांचा समीर सर्वप्रिय विहार येथील राहणारा आहे. तो गुडगावमधील एका कंपनीत सेल्स मॅनेजरची नोकरी करतो. पोलिसांनी सांगितलं की, 23 सप्टेंबरच्या सकाळी पीडित व्यक्तीला गेटच्या समोर फुलांमध्ये लेटर आणि एक पेन ड्राइव्ह मिळालं. त्यात लिहिलं होतं की, 10 लाख रुपये दिले नाही तर तुझ्या गर्लफ्रेंडसोबतचे काही खासगी व्हिडीओ व्हायरल करीन. एका फ्लायओव्हरजवळ पैसे आणण्यास येथे सांगितलं होतं**. (हे ही वाचा-** मुलाला वाचवण्यासाठी आजी-आजोबांनी आखलं भयंकर कारस्थान; नातीचा घेतला बळी ) रात्री साधारण 12 वाजता आरोपी सांगितलेल्या जागेवर पैशांनी भरलेली बॅग उचलायला आला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं. आरोपीचं नाव समीर असल्याचं समोर आलं आहे. त्याने सांगितलं की, गेल्या 7 ते 8 वर्षांपासून तो पीडित तरुणाचा मित्र आहे. दोघेही गुडगावमधील वेगवेगळ्या कंपनीत नोकरी करीत होते. आरोपीने सांगितलं की, तो पीडित तरुणासोबत ऑक्टोबर 2020 मध्ये एक कॅफेत भेटला होता. त्यावेळी त्याने पीडित तरुणाच्या लॅपटॉपमधून काही खासगी व्हिडीओ लपून कॉपी केले होते. यानंतर त्याने अधिक पैसे कमवण्यासाठी हे कारस्थान आखलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आपल्याकडून पैसे उकळणारा हा आपला मित्रचं असल्याचं कळाल्यावर पीडित तरुणाला धक्का बसला.