JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / जामीन मिळण्याच्या 1 दिवस आधीच कैद्याची तिहार तुरुंगात हत्या; नातेवाईकांमध्ये आक्रोश

जामीन मिळण्याच्या 1 दिवस आधीच कैद्याची तिहार तुरुंगात हत्या; नातेवाईकांमध्ये आक्रोश

Murder in Tihar Jail: देशाची राजधानी दिल्लीतील तिहार तुरुगांत (Tihar jail) शुक्रवारी कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत (clash between inmates) एका कैद्याच्या मृत्यू झाला (Prisoner death) आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 मे: देशाची राजधानी दिल्लीतील तिहार तुरुगांत (Tihar jail) शुक्रवारी कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत (clash between inmates) एका कैद्याच्या मृत्यू झाला (Prisoner death) आहे. संबंधित मृत कैद्याचं नाव श्रीकांत उर्फ अप्पू असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिहार तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, शुक्रवारी मृत श्रीकांतचं अन्य कैद्यांसोबत भांडण झालं. या भांडणातून संबंधित कैद्यांनी मृत कैदी श्रीकांतला जबरी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच, तुरुंग अधिकाऱ्यांनी जखमी कैद्याला सफदरजंग येथील रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संबंधित मृत कैदी श्रीकांत 2015 पासून तिहार तुरुंगात आपली सजा भोगत होता. त्याच्यावर हत्येसोबतच जबऱ्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते. मृत कैदी दिल्लीतील रोहिणी परिसरातील रहिवासी आहे. तो मागील बऱ्याच दिवसांपासून तिहार तुरुंगातील बराक नंबर 2 मध्ये सजा भोगत होता. शनिवारी तो जामीनावर बाहेर येणं जवळपास निश्चित झालं होतं. पण तिहार तुरुंगातून सुटका होण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून मृत कैद्याच्या नातेवाईकांनी तुरुंगाबाहेर बराच गोंधळ घातला आहे. तिहार तुरुंगात अशाप्रकारे कैद्यांचा मृत्यू होणं किंवा हत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिहार तुरुंगात कैद्याची हत्या करण्यात आली आहे. हे ही वाचा- 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा मृत्यू, नाशिक कारागृहात भोगत होता शिक्षा गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातदेखील तिहार तुरुंगात एका कैद्याची हत्या करण्यात आली होती.  तिहार तुरुंगाच्या 3 नंबरच्या बराकीत राहणाऱ्या एका कैद्याची हत्या करण्यात आली होती. तेव्हाही तुरुंगात मोठी खळबळ उडाली होती. तिहार तुरुंग प्रशासनाच्या मते, नोव्हेंबरमध्ये दिलशेर नावाच्या एका 23 वर्षीय कैद्याची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या