JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पाकिस्तानातील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'विवाहित' प्रेयसीचा प्रताप, बॉर्डर क्रॉस करण्याच्या होती तयारीत

पाकिस्तानातील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'विवाहित' प्रेयसीचा प्रताप, बॉर्डर क्रॉस करण्याच्या होती तयारीत

ही महिला आपल्या सासरहून पळून पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 7 जानेवारी : पाकिस्तानातील (Pakistan) तरुणावर प्रेम जडल्याने विवाहित महिला पाकिस्तानात (boyfriend in Pakistan) जाण्यास तयार झाली. महिला घरातून पळून अमृतसरला पोहोचली. येथे पोलिसांनी तिला पकडलं. तरुणाला भेटण्यासाठी महिला पोलिसांसमोर विनंती करीत होती. कडक चौकशी केल्यानंतर तिने विवाहित असल्याचं सांगितलं. महिला धोलपूरहून आली आहे. (Pratap of married girlfriend was preparing to cross border to meet her boyfriend in Pakistan) पोलिसांनी महिलेच्या सासरच्यांनी या घटनेची माहिती दिली. सासरचेदेखील अमृतसरला पोहोचले. आज ते महिलेला धौलपूरला घेऊन येणार आहेत. धौलपूरच्या पोलिसांनी सांगितलं की, महिला त्याच्या भागातील राहणारी आहे. ती दोन दिवसांपूर्वी आपल्या 2 वर्षांच्या मुलाला घरी सोडून पळून आली. सासरच्या मंडळींनी आजूबाजूला चौकशी केली होती, मात्र ती कुठेच सापडली नाही. यादरम्यान गुरुवारी अमृतसर पोलिसांनी महिलेबाबत तिच्या सासरच्या मंडळींना माहिती दिली. हे ही वाचा- हे आई-बाबांना कळालं तर…’;पालकांच्या भीतीने 10 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 6 महिन्यांपूर्वी झाली होती मैत्री… महिलेने सांगितलं की, 6 महिन्यांपूर्वी ऑनलाइन लुडो खेळताना पाकिस्तानात राहणारा तरुण अली याच्यासोबत मैत्री झाली होती. दोघे व्हॉट्सअॅपवर बोलत होते. तरुणाने तिला भेटण्यासाठी पाकिस्तानात बोलावलं. तरुणाने सांगितलं की, तिने कसंही करून अटारी बॉर्डरपर्यंत यावं. तेथे त्याचा मित्र त्याला पाकिस्तानात घेऊन जाईल. कुटुंबीय आणि दोन वर्षांच्या मुलाला सोडून बुधवारी दुपारी ती अमृतसरला जाण्यासाठी निघाली. जालियनवाला बागवर जाऊन अटारी जाण्यासाठी टेम्पो शोधू लागली. यादरम्यान अमृतसर पोलिसांनी तिला पकडलं. चौकशीदरम्यान महिलेने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. महिलेने तरुणाची भेट घडवून आणण्यासाठी पोलिसांकडे विनंती केली. पोलिसांनी महिलेकडून सासरच्या मंडळींचा नंबर घेतला आणि त्यांला बोलावून घेतलं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या