इटारसी, 6 सप्टेंबर : पत्नीला (Wife) बेशुद्ध (unconscious) करून तिच्या तोंडात घरगुती गॅसची पाईप (LPG Gas pipe) कोंबून हत्या (Murder) करणाऱ्या पतीला (Husband) पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. सततच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीला बेशुद्ध केले, तिच्या तोंडात गॅसची पाईप घातली आणि तिचा मृत्यू झाल्यावरही तिच्या शरीराचा काही भाग जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या मुलीला घेऊन रेल्वेने पळून चाललेल्या आरोपीला पोलिसांनी जीपीएस लोकेशनच्या आधारे अटक केली. अशी घ़डली घटना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात शाहनवाज सैफी आणि सदफ सैफी हे जोडपं राहत होतं. त्यांना 2 वर्षांची मुलगी आहे. या दोघांना प्रेमविवाह झाला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये कडाक्याची भांडणं होत होती. या भांडणाला वैतागून शाहनवाजने पत्नीला औषध देऊन बेशुद्ध केले आणि तिच्या तोंडात गॅसची पाईप घालून तिचा ठार केले. त्यानंतर तिच्या शरीराला आग लावून घराला बाहेरून कुलूप लावून त्याने पोबारा केला. दोन वर्षांच्या मुलीला घेऊन तो उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी चालला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सदफ सैफीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आणि शाहनवाजचा शोध सुरू केला. हे वाचा - जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या आईचा भयावह अंत; अंगावर काटा उभा राहील असा लागला शोध पोलिसांनी शाहनवाजचा फोन नंबर मिळवला आणि तो ट्रेस केला. त्याचे लोकेशन मध्यप्रदेशमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं. त्याच्या बदलत जाणाऱ्या लोकेशनवरून तो ट्रेनने उत्तर प्रदेशकडे चालल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अखेर मध्यप्रदेशमधील इटारसी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्याला गाठलं आणि अटक केली. पोलिसांनी शाहनवाजविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर रोजी शाहनवाजने पत्नीची हत्या केली होती आणि त्यानंतर तिथून पोबारा केला होता. या घटनेमुळे मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे.