JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / हजारो कोटींची फसवणूक, नाशिकमध्ये नाव बदलून बनला कांदा व्यापारी, महाठग सापडला पोलिसांच्या जाळ्यात

हजारो कोटींची फसवणूक, नाशिकमध्ये नाव बदलून बनला कांदा व्यापारी, महाठग सापडला पोलिसांच्या जाळ्यात

पीयूष तिवारी हा कांदा व्यापारी पुनीत भारद्वाज म्हणून नाशिकमध्ये राहत होता. चौकशीत त्यानं 2011 मध्ये बिल्डर म्हणून व्यवसाय सुरू केल्याचं उघड झालं. त्यानं 2018 पर्यंत 15-20 छोट्या कंपन्यांसह सुमारे 8 कंपन्या स्थापन केल्या होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 मार्च : उत्तर दिल्ली जिल्हा पोलिसांच्या अँटी ऑटो थेफ्ट युनिट (AATS) पथकानं कुख्यात भू-माफियाला अटक केली आहे. त्याच्यावर फसवणूक प्रकरणात 50 हजारांचं बक्षीस लावलं होतं. आरोपी पीयूष तिवारी (Fraud Piyush Tiwari Arrested) यानं नोएडा, यूपी इथं फ्लॅट देण्याच्या बहाण्यानं लोकांची हजारो कोटींची फसवणूक (financial fraud) केली होती. त्याला न्यायालयानं फरारही घोषित केलं होतं. आरोपी पियुष तिवारी दिल्ली, यूपी आणि पंजाबच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या 30 हून अधिक गुन्ह्यांमध्ये हवा होता. त्याची पत्नी शिखा हिचाही फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असून ती सध्या तुरुंगात आहे. पीयूष तिवारी हा कांदा व्यापारी पुनीत भारद्वाज म्हणून नाशिकमध्ये राहत होता. चौकशीत त्यानं 2011 मध्ये बिल्डर म्हणून व्यवसाय सुरू केल्याचं उघड झालं. त्यानं 2018 पर्यंत 15-20 छोट्या कंपन्यांसह सुमारे 8 कंपन्या स्थापन केल्या होत्या. 2016 मध्ये त्याच्या घरावर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले होते. यामध्ये सुमारे 120 कोटी रुपये सापडले. ही रक्कम प्राप्तिकर विभागानं जप्त केली. यानंतर त्यांची पडझड सुरू झाली आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून त्याचा व्यवसाय कोसळला. हे वाचा -  पुणे हादरलं, कोथरुडमध्ये पोत्यात आढळला 13 वर्षीय विशेष मुलाचा मृतदेह अशा प्रकारे सुरू केली लोकांची फसवणूक मार्केटमध्ये पुन्हा उभं राहण्यासाठी त्यानं अनेक खरेदीदारांना फ्लॅट विकण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक सुरू केली. यावरून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याच्यावर आणखी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून विविध राज्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३० हून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड (wanted) होता. त्यानंतर त्यानं दिल्लीतून पळ काढला आणि खोट्या नावाने दक्षिण भारतात आपला ठावठिकाणा हलवून विविध धंदे करायला सुरुवात केली आणि नंतर त्याला अटक झाली. दिल्ली/एनसीआरमध्ये फ्लॅट्स/प्लॉट्स हवे असणाऱ्या लोकांना तो फसवायचा. हे वाचा -  प्रेमाचं नाटक करत GFच्या आईलाच बनवलं टार्गेट, 7 महिन्यानंतर फरार आरोपीला अटक अशा प्रकारे दिल्ली पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले तिवारी याच्यावर पाळत ठेवली असता, तो नाशिकमध्ये राहत असून कांद्याचा व्यवसाय करतो, असं आढळून आलं. पियुष तिवारी ऊर्फ पुनीत भारद्वाज (वय 42) दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहे. तो मूळचा टॉवर-ए, ओमॅक्स फॉरेस्ट स्पा, सेक्टर-93 बी, नोएडा, यूपी इथं एका फ्लॅटमध्ये राहत होता. सुरुवातीला त्यानं दिल्ली एनसीआरमध्ये जाहिरात एजन्सी सुरू केली आणि नंतर त्याने एजन्सी विकली आणि नोएडा यूपीमध्ये इमारती बांधण्यात पैसे गुंतवले. मालमत्तेच्या विक्री/खरेदीच्या बहाण्यानं त्यानं अनेक भोळ्या-भाबड्या लोकांची फसवणूक सुरू केली. त्यानं एकच फ्लॅट अनेक खरेदीदारांना विकून पैसे जमवले. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर तो दिल्ली/एनसीआरमधून पळून गेला आणि महाराष्ट्रात नाशिकमध्ये राहू लागला. नव्या ओळखीसह, पियुष तिवारी पुनीत भारद्वाजच्या वेशात आला. परंतु, त्याच्या युक्त्या कामी आल्या नाहीत आणि पोलिसांनी त्याला पकडलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या