JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पती आणि पत्नी करायचे अश्लील गोरखधंदा, समजल्यावर व्हाल हैराण; वाचा पूर्ण घटना

पती आणि पत्नी करायचे अश्लील गोरखधंदा, समजल्यावर व्हाल हैराण; वाचा पूर्ण घटना

अगोदर रोमँटिक स्टाईलने लोकांनी (Police arrested husband and wife for a sex hoax) गप्पा मारून नंतर ब्लॅकमेल करणाऱ्या पती आणि पत्नीच्या गँगला पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गाझियाबाद, 22 ऑक्टोबर : अगोदर रोमँटिक स्टाईलने लोकांनी (Police arrested husband and wife for a sex hoax) गप्पा मारून नंतर ब्लॅकमेल करणाऱ्या पती आणि पत्नीच्या गँगला पोलिसांनी अटक केली आहे. एक वेबसाईट काढून वेगवेगळ्या (Sex hoax through website) धनिकांना ही जोडगोळी हेरायची. त्यांच्याशी ऑनलाईन गप्पागोष्टी करत वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर द्यायची. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या (Sexual conversation and blackmail) माध्यमातून अश्लील संभाषण रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करायची. आतापर्यंत कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या या टोळीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. असा चालायचा गोरखधंदा दिल्लीच्या गाझीयाबादमध्ये राहणाऱ्या योगेश आणि सपना या पती पत्नीनं लोकांना ब्लॅकमेल करून पैसे लुटण्याची आयडिया शोधून काढली. सपनाची काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील शनी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. शनीनेच ही आयडिया सपनाला दिली आणि त्यानंतर सपनाने प्लॅन आखला. वेबसाईटवरून वाढवायचे ओळख सपना आणि योगेशने एक वेबसाईट काढत त्याद्वारे वेगवेगळ्या नागरिकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी काही मुलीदेखील अपॉइंट केल्या होत्या. त्यांना महिन्याला 20 ते 25 हजार रुपये पगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. या मुली ऑनलाईन नागरिकांना हेरून त्यांच्याशी रोमँटिक संभाषण सुरू करत. त्यांच्या जाळ्यात फसलेले अनेकजण मुलींकडे वैयक्तिक नंबर मागत. त्यानंतर मुली त्यांना स्वतःचा व्हॉट्सअप नंबर देत असत, जो अर्थातच बोगस असे. त्यानंतर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरून ग्राहकांसोबत त्यांचं अश्लील संभाषण सुरू होई. हे संभाषण रेकॉर्ड करून त्याच्या आधारे ग्राहकांना ब्लॅकमेल केलं जात होतं. हे संभाषण व्हायरल न करण्याच्या बदल्यात एका विशिष्ट खात्यात रक्कम ट्रान्सफर करायला त्यांना सांगितलं जात असे. हे वाचा- विश्वासघात असह्य झाल्याने पतीची आत्महत्या, पत्नीनेही पेटवून घेत संपवलं जीवन असं फुटलं बिंग गुजरातमधील राजकोटमध्ये राहणाऱ्या तुषार नावाच्या व्यक्तीकडून या दोघांनी आतापर्यंत 8000000  रुपये लुटले होते. त्यानंतर वैतागलेल्या तुषारने राजकोट पोलिसांत तक्रार दिली. या पोलिसांनी गाझियाबाद पोलिसांच्या मदतीने या टोळीचा पर्दाफाश केला. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अनेक मोबाईल फोन, चेक बुक, पासपोर्ट, एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या