JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / विषारी दारु प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांनी गमावला होता जीव

विषारी दारु प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांनी गमावला होता जीव

अलिगढमध्ये (Aligarh) विषारी दारू (Hooch Tragedy) प्यायल्याने 108 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी ऋषि शर्माला (Rishi Sharma) रविवारी सकाळी बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक केली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 06 जून : उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अलिगढमध्ये (Aligarh) विषारी दारू (Hooch Tragedy) प्यायल्याने 108 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी ऋषि शर्माला (Rishi Sharma) रविवारी सकाळी बुलंदशहर बॉर्डरवरुन अटक केली आहे. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी  एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. याआधी शनिवारी 25 हजारांचं बक्षीस जाहीर केलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर, भाजप नेता ऋषि शर्माचं अवैध फार्म हाऊस जेसीबीच्या सहाय्यानं उद्धवस्त करण्यात आलं होतं. वि।षारी दारुमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतच आहे. प्रकरणाचा तपास वेगानं होऊ लागताच माफियांनी कारवाईच्या भीतीनं विषारी दारु कालव्यात ओतून दिली. यानंतर सगळ्यात आधी जवां कालव्यातील विषारी दारु प्यायल्यानं 10 कामगारांचा मृत्यू झाला. तर, अकराबादमध्ये शेखा कालव्यात मिळालेली दारु प्यायल्यानं कामगारांची प्रकृती बिघडली. तर, शनिवारी बिहारमधील पाच कामगारांचा जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमध्ये पती जिवंत जळाला, 35 दिवसांनी पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल विषारी दारु प्रकरणात फरार असलेला आरोपी भाजप नेता बीडीसी ऋषि शर्मा याच्या जवां ठाण्याच्या क्षेत्रातील फार्महाऊसवर शनिवारी प्रशासनानं जेसेबीच्या सहाय्यानं कारवाई केली. एसडीएम कोल रंजीत सिंह यांच्या नेतृत्वातील टीमनं ही कारवाई केली. या फार्महाऊसचा काही भाग सरकारी जमिनीवर असल्याचंही तपासात समोर आलं आहे. जवां आणि अकराबाद क्षेत्रात कॅनोलमध्ये वाहून आलेली अवैध दारू प्यायल्यानं अनेक लोकांनी जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत आता वरच्या गंगा कालव्याची साफसफाई करण्याबरोबरच पाटबंधारे विभाग अवैध दारू शोधून नष्ट करेल. दोन दिवस हा कालवा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला डीएम यांनी दिल्या आहेत. विभाग कालवा बंद करुन साफसफाई करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या