JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणं महागात पडलं, मुंबईतील पतीची तुरुंगात रवानगी

पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणं महागात पडलं, मुंबईतील पतीची तुरुंगात रवानगी

महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिचं पाच वर्षांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या अभिषेक निगमसोबत लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर तिचा नवरा तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवायचा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 24 डिसेंबर : पती आणि पत्नीचं नातं हे अतिशय खास, प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं असतं असं म्हणतात. मात्र, अनेकदा अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडणाऱ्या असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमधून समोर आली आहे. यात आपल्या पत्नीसोबत अननॅचरल सेक्स करणाऱ्या पतीला इंदूर पोलिसांनी मुंबईतून अटक केलं आहे . यानंतर कोर्टात हजर करून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. Kolhapur Firing News : मुलीसोबत गैरकृत्य करत होता पती, नकार दिल्याने थेट पत्नीवरच गोळीबार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ मिळालेल्या माहितीनुसार, सतना येथे राहणाऱ्या एका महिलेने इंदूरमधील एमजी रोड पोलीस ठाण्यात तिच्याच पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिचं पाच वर्षांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या अभिषेक निगमसोबत लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर तिचा नवरा तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवायचा. पतीच्या त्रासाला कंटाळून ही महिला इंदूरच्या एमजी रोड येथे राहू लागली. पण महिलेची दुर्दशा इथेच थांबली नाही. इंदूरमध्ये येऊन त्याने पीडितेसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे व्यथित झालेल्या महिलेने एमजी रोड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपी पतीचा शोध सुरू केला. Honey Trap UP Police : प्रेमातून हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढायची नंतर लाखोंना फसवायची, कोण आहे ही बेगम? सायबर टीमच्या मदतीने पोलिसांनी फोनच्या आधारे आरोपीचा सातत्याने शोध घेतला. मात्र याच दरम्यान आरोपी परदेशात पळून गेला. तरीही पोलीस सतत त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. आरोपी मुंबईत परतताच एमजी रोड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक टीना शुक्ला यांनी हेडकॉन्स्टेबल योगेंद्र जोशी यांच्यासह मुंबई गाठून आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला इंदूरच्या जिल्हा न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या