JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लुटारू वधूला अटक; लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पैसे आणि दागिने घेऊन करायची पोबारा, नाव बदलून करायची लग्नं

लुटारू वधूला अटक; लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पैसे आणि दागिने घेऊन करायची पोबारा, नाव बदलून करायची लग्नं

स्वतःचं नाव बदलून (Name Change) वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न (marriage) करणाऱ्या आणि दुसऱ्या दिवशी दागिने-पैसे (Jewellery and cash) घेऊन पोबारा करणाऱ्या लुटारू वधूला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.

जाहिरात

लग्न करन दागिने-पैसे घेऊन पोबारा करणारी पूजा साकेत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 6 ऑगस्ट : स्वतःचं नाव बदलून (Name Change) वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न (marriage) करणाऱ्या आणि दुसऱ्या दिवशी दागिने-पैसे (Jewellery and cash) घेऊन पोबारा करणाऱ्या लुटारू वधूला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. आतापर्यंत या महिलेनं अऩेकांना असा गंडा घातल्याचं स्पष्ट झालं आहे. यावेळी मात्र जंगलात गाव असणाऱ्या पुरुषाशी लग्न केल्यामुळे तिला पळून जाता आलं नाही. पोलिसांनी तिला गाठल्यामुळे तिचं बिंग फुटलं. अशी उघडकीला आली चोरी मध्यप्रदेशमधील पूजा साकेत असं खरं नाव असलेल्या या महिलेनं प्रिती यादव असं खोटं नाव धारण करून विजयपाल यादव नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. ढोडन नावाच्या जंगलातील गावात यादव कुटुंब राहत होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळून गेलेल्या पूजाबाबत पती विजयपालनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाठलाग करून तिला जंगलातच गाठलं आणि बेड्या ठोकल्या. वाटेत जंगल असल्यामुळे तिला नेहमीसारखा सराईतपणे पोबारा करता आला नाही. या महिलेसोबत आणखी एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. तो तिचा भाऊ असल्याचा बहाणा करून तिला या गुन्ह्यांमध्ये मदत करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महिलेने या अगोदर अनेक पुरुषांसोबत लग्न करून दुसऱ्या दिवशी पोबारा केल्याचं कबूल केलं आहे. लग्न करून एक रात्र सासरी राहणे आणि दुसऱ्या दिवशी घरातील दागिने आणि पैसे घेऊन पोबारा करणे, ही पूजा साकेत आणि तिच्या साथीदाराची कार्यपद्धती होती. हे वाचा - गावातल्या जिद्दी मुलीची कहाणी; IAS अंकिता चौधरींनी अडथळ्यांवर मात करत मिळवलं यश आतापर्यंत अनेक प्रकरणांत यशस्वीपणे पोबारा करण्यात तिला यश आलं होतं. मात्र यावेळी जंगल असल्यामुळे तिला पळून जाता आलं नाही. वेळेत तिच्या पतीने तक्रार केल्यामुळे पोलीस या महिलेपर्यंत पोहोचू शकले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या