पुणे, 13 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार, तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सख्खा बापाने आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच पुण्यातून आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. घरात झोपलेल्या 19 वर्षांच्या तरुणीवर सावत्र मामाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - जबरदस्तीने शरीर संबंध ठेवणाऱ्या आणि घरातील लोकांना जिवे मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या सावत्र मामाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी केली. याप्रकरणी एका 19 वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना मार्च 2022 मध्ये घडली होती. आरोपीचे वय 30 वर्ष आहे. आरोपी हा फिर्यादीचा सावत्र मामा आहे. फिर्यादी घरी झोपलेल्या असताना तिच्या घरात येऊन सावत्र मामाने तिच्यासोबत तिच्या मनाविरुद्ध शारिरिक संबंध ठेवले. तसेच याप्रकाराला पीडित तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला कोणाला काही सांगितल्यास घरातील लोकांना मारून टाकेन, अशी धमकीही दिली होती. यामुळे तरुणी घाबरुन गेली होती. म्हणून तिने त्यावेळी तक्रार केली नाही. हेही वाचा - सख्ख्या बापाकडूनच तरुण मुलीचे लैंगिक शोषण; पुण्यातील धक्कादायक घटना मात्र, त्यानंतर नराधम आरोपी हा तिला वारंवार धमकावत होता. अखेर या प्रकाराला कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. दिलेल्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे करीत आहेत. दरम्यान, पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे समोर येत आहे.