पुणे पोलीस
पुणे, 10 मे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने हैदोस घातला होता. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्यास हटकल्याने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना मुंढवा भगातील केशवनगर येथे घडली. यानंतर गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी आरोपींची त्याच परिसरात धींड काढली.
काय आहे प्रकरण? घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्यास हटकल्यााने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. मुंढवा भगातील केशवनगर येथे हा प्रकार उघडकीस आला. ज्येष्ठ नागरिकाचा किरकोळ कारणामुळे खून करण्याऱ्या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी त्यांची त्याच परिसरात धींड काढली. रवींद्र दिगंबर गायकवाड, असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गाई म्हशींचा गोठा आहे. गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थाची नशा करत बसले होते. या आरोपींना आज पोलिसांनी अटक केली आणि त्यांची धिंड काढली. नागनाथ पाटील, रोहित घाडगे, सनी चव्हाण अशा आरोपीचे नाव आहेत. वाचा - त्याच्यासाठी कुटुंबाला सोडून राहिली, अखेर तिच्याच मृत्यूची बातमी आली! येरवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास कोयता गँगचा हैदोस येरवडा येथे अज्ञात कोयता माजी नगरसेविकेच्या घरासमोर लावलेल्या चार चाकी गाड्यांची रात्रीच्या वेळी तोडफोड केली. तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी सुभाष उर्फ पापा राठोड, अनिल उर्फ पोपट वाल्हेकर या दोघांचा चव्हाण गँगनी धारधार हत्याराने मर्डर केला होता. त्यातील तीन आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली होती. त्या रागातून खून झालेल्या राठोड गटातील तरुणानी रात्रीच्या अंधारात गाड्या फोडल्याचा संशय येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिघांविरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चार चार चाकी, रिक्षा, दुचाकी या गाड्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नुकताच जामीनवर सुटलेल्या शंकर माणू चव्हाण यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.