JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताच संशय

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताच संशय

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून नातेवाईकांनी घातपाताच संशय व्यक्त केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

खारघर, 5 सप्टेंबर : रायगड जिल्ह्यातील खारघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत. पोलीस ठाण्यात घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर सदर व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालय आणि पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. काय आहे प्रकरण? खारगरमधील एक व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र, तिथेच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलीस ठाण्यातच घातपात झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. रामसिंग चव्हाण असे 42 वर्षीय मृताचे नाव आहे. सदर व्यक्तीला पोलीस ठाण्यात हृदय विकाराच्या झटका आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी रामसिंग चव्हाण यांना जवळच्या MGM रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर चव्हाण यांना मृत घोषित केलं. मात्र, या घटनेनंतर मृताचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे खारघर पोलीस स्टेशनबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर MGM रुग्णालयाबाहेरही नातेवाईक जमले आहेत. आता मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर खरंकाय ते बाहेर येईल. मात्र, सध्यातरी नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. वाचा - बीड हादरलं! विष प्राशन, नंतर भावाला फोन, महिला मृत्यूआधी रडली ढसाढसा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या