JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Murder : दुहेरी हत्याकांडाने परभणी हादरलं, घरात वृद्ध दाम्पत्य धारातीर्थ, जवळच्या व्यक्तीकडूनच खून?

Murder : दुहेरी हत्याकांडाने परभणी हादरलं, घरात वृद्ध दाम्पत्य धारातीर्थ, जवळच्या व्यक्तीकडूनच खून?

परभणी तालुक्यातील असोला येथे वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

परभणी, 16 मार्च : परभणी (Parbhani) तालुक्यातील असोला येथे वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या वृद्ध दाम्पत्याला भेटायला आलेली अन्य एक महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळली आहे. संबंधित घटना ही मंगळवारी (15 मार्च) रात्री उशीरा घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतक दाम्पत्याने सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने शेजारच्यांना संशय आला. त्यांनी घराचा दरवाजा लोटून पाहिला असता संबंधित धक्कदायक प्रकार उघडकीस आला. शेजारच्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. संबंधित घटनेत 70 वर्षीय शंकर ग्‍यानोजी रिक्षे आणि त्यांच्या 60 वर्षीय पत्नी सारजाबाई रिक्षे यांचा मृत्यू झाला आहे. रिक्षे दाम्पत्याची नेमकी हत्या कुणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. विशेष म्हणजे रिक्षे दाम्पत्याच्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या गिरजाबाई अडकिने या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. संबंधित घटना ही घरगुती वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पण पोलीस याप्रकरणी अद्याप निष्कर्षावर आलेले नाहीत. ( लग्नाच्या आमिष दाखवून ज्ञानेश्वरचा झाला मोहम्मद, पण 6 दिवसांनीच झाली धर्मवापसी ) गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरजाबाई अडकिने काल आपली बहीण सारजाबाई शंकर रिक्षे यांना भेटण्यासाठी असोला येथे आल्या होत्या. त्यांच्यासोबत 30 ते 35 वर्षाचा युवक देखील आला होता. त्यानंतर रात्री ते सर्व त्या ठिकाणी मुक्कामी होते. पण सकाळी उशिरापर्यंत रिक्षे यांचा दरवाजा बंद होता. त्यामुळे हा प्रकार कोणालाही लक्षात आला नाही. ऊन डोक्यावर आलं, तरी देखील दरवाजा उघडला नसल्याने, शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा लोटून पाहायचा प्रयत्न केला. तर हा धक्कादायक प्रकार त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी तातडीने संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हा प्रकार नेमका कशामुळे झाला, कोणी केला याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. विशेष म्हणजे गिरजाबाई यांच्यासोबत आलेला तो युवक घटनेनंतर गायब झाल्याने गावामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून अशीच एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या जुन्या वादातून चुलत भावाने बहिणीचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना मावळ (Maval) तालुक्यात घडली आहे. नराधम भावाने चक्क कोयत्याने स्वत:च्या चुलत बहिणीच्या हातावर, डोक्यावर आणि तोंडावर असे 35 वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत राघू माळी असं आरोपी भावाचे नाव आहे. तर फासाबाई साळू निसाळ असे खून झालेल्या दुर्देवी बहिणीचे नाव आहे. या प्रकरणी साळू मारुती निसाळ यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शेतीच्या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केले, असे पोलीस तपासातून उघड झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या