मृत तरुण
कोटा, 22 ऑगस्ट : एका तरुणाला मस्करीमध्ये जीव गमवावा लागला. हा तरुण मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आला होता. पार्टीत दारू पीत असताना मित्राने त्याच्याशी अशी चेष्टा केली की तो घाईघाईत छतावरून उडी मारायला लागला. याचदरम्यान त्याचा वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात घडली. काय आहे संपूर्ण प्रकार - वाढदिवसाच्या पार्टीच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर त्याचे मित्र फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. हे प्रकरण कोटा जिल्ह्यातील सिमलिया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. मृत तरुण नरेश कंडारा हा तेजपुरा बस्ती येथील रहिवासी होता. सिमलिया पोलिस ठाण्यातून त्याच्याविरुद्ध एका खटल्यासंदर्भात वॉरंट जारी करण्यात आले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी नरेशला त्याच्या घरी शोधण्यासाठी गेले होते. मात्र, तो घरी सापडला नाही. शनिवारी रात्री नरेश बाबा रक्ताया भैरुजी मंदिर परिसरात मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आला होते. तिथे त्याने मित्रांसोबत वाईन प्यायली. यानंतर रात्री सुमारे 10 केक कापत असताना त्याला एका मित्राने गमतीने सांगितले की इथे पोलीस येणार आहेत. हे ऐकून नरेश घाबरला आणि धावतच धर्मशाळेच्या छतावर गेला आणि तेथून खाली उडी मारायला लागला. मात्र, रात्री अंधार असल्याने आणि तो दारूच्या नशेत असल्याने त्याला तेथील 11 केव्हीची विद्युत लाईन समजली नाही. आणि अंधारात तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. हेही वाचा - Live-in पार्टनर हत्याकांड; मैत्रिणीने पॅक केला मृतदेह, तुरुंगात प्रेयसीने केला धक्कादायक खुलासा दरम्यान, ही धक्कादायक घटना घडल्यावर तिथे गोंधळ उडाला. यानंतर पार्टी करत असलेल्या मित्रांनी तेथून पोबारा केला. तसेच नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.