JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / एक एक करत कुटुंबातील तिन्ही पुरुषांनी सोडला जीव; महिलाही रुग्णालयात मोजते शेवटच्या घटका

एक एक करत कुटुंबातील तिन्ही पुरुषांनी सोडला जीव; महिलाही रुग्णालयात मोजते शेवटच्या घटका

दोन्ही लेक गेले, नवऱ्यानेही सोडला जीव, महिलेवर ओढवली भयानक परिस्थिती…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 16 मे : सध्या अनेकांना कौटुंबिक, आर्थिक तणाव असतो. यातून गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. वादविवाद, दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं आपण अनेक वेळा ऐकतो, पाहतो. उत्तर प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्व जण हादरून गेले आहेत. संबंधित कुटुंबातल्या सदस्यांना तर जबर मानसिक धक्का बसला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घेऊ या. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या त्रिवेणीनगरच्या मौसम बाग कॉलनीत राहणाऱ्या एका कुटुंबातल्या व्यक्तींचा एकापाठोपाठ एक अशा रीतीने दुर्दैवी अंत झाला. कुटुंबातल्या लहान व्यक्तीचा हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाला. या घटनेचा त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला. दुःखी झालेल्या त्याच्या वडिलांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हे सत्र इथेच थांबलं नाही. मौसमी बाग कॉलनीत निवृत्त अभियंता नागेंद्र प्रताप सिंह हे मुलगा सूरज प्रताप सिंह, सून रुबी आणि श्रीकांत, कृष्णकांत या दोन नातवांसह राहत होते. नागेंद्र प्रताप सिंह यांच्या कुटुंबावर एका पाठोपाठ एक दुःखाचे डोंगर कोसळले. त्यांच्या धाकट्या नातवाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी, म्हणजेच नागेंद्र प्रताप सिंह यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. एक नातू आणि मुलाच्या मृत्यूनंतर नागेंद्र प्रताप सिंह यांना पुन्हा दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. त्यांचा मोठा नातू श्रीकांत याने सोमवारी (15 मे) विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. या घटनेचा धक्का बसल्याने त्याच्या आईला हार्ट अॅटॅक आला. तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीकांत हा इंजिनिअर होता. लॉकडाउनमध्ये त्याची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो त्याच्या लखनौमधल्या घरी राहत होता. वडील आणि भावाच्या अकाली निधनामुळे तो खचला होता. सोमवारी तो उशिरापर्यंत झोपेतून उठला नाही म्हणून त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली; पण त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याचे आजोबा नागेंद्र सिंह प्रताप यांनी शेजारच्या लोकांना बोलावलं. त्यांनी श्रीकांतला रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सिंगापूरला सुट्टी घालवायला गेला, रात्री 11.30 वा. घडला धक्कादायक प्रकार; सोहमचा मृतदेहच आला मुंबईत… या घटनेने नागेंद्र प्रताप सिंह यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. गेल्या 31 मार्च रोजी त्यांचा धाकटा नातू कृष्णकांतचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने त्याचे वडील सूरज प्रताप सिंह यांनी त्याच दिवशी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मुलगा आणि पतीच्या निधनामुळे दुःखी असलेल्या रुबी यांना श्रीकांतच्या निधनामुळे पुन्हा धक्का बसला. आपला एकमेव आधार गमवल्याने रुबी खचल्या आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर शेजारच्यांनी तिला शहरती्याल मिडलँड रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलगा आणि दोन नातवांच्या अकाली निधनामुळे नागेंद्र प्रताप सिंह खचले आहेत. सोमवारी शेजारची माणसं आणि नातेवाईकांनी श्रीकांतवर अंत्यसंस्कार केले. रुग्णालयात असलेल्या रुबी यांची देखभाल त्यांच्या कुटुंबाच्या जवळच्या व्यक्ती करत आहेत. या दुःखद घटनेमुळे नागेंद्र प्रताप सिंह धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत. ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. रुग्णालयात असलेल्या सुनेच्या प्रकृतीची अधूनमधून चौकशी करत आहेत. या घटनांमुळे हे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या