JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कर्ज काढून देतो म्हणून वृद्धाला 6 लाखांना लुबाडले, अमरावतीतील धक्कादायक घटना

कर्ज काढून देतो म्हणून वृद्धाला 6 लाखांना लुबाडले, अमरावतीतील धक्कादायक घटना

या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी बँक व्यवस्थापक, बँक लिपिक निकिता साबळे आणि एजंट प्रविण उके या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 29 नोव्हेंबर : कर्ज (Loan) काढून देतो म्हणून दलाला मार्फत एका वृद्धाचे बँक खात्याचे चेकबुक व एटीएमम स्वतः जवळ ठेवून संगणमताने त्यांच्या खात्यातून 6 लाख 85 हजार 999 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अमरावती (Amravati) शहरातील इरविन चौकातील इंडसइंड  बॅंकेत (indusind bank) घडली आहे. खरैया नगर इथं राहणाऱ्या हरिश्चंद्र वानखडे या 74 वर्षीय वृद्धाने कर्ज काढण्यासाठी इंड्सइंड बँकेत चौकशी केली होती. त्यानंतर आरोपींनी  वानखडे यांना घराचे सगळे कागदपत्रे घेऊन बोलावले होते. त्यांच्या घराच्या कागदपत्रांवर 6 लाख 85 हजार रक्कमेची लोन केस बँकेचा एजंट प्रवीण उके याने मंजूर केले होते.

ही लोकं मोठी नाहीत, केवळ वयानं मोठी झाली आहेत; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

पण, 6 लाख 85 हजारांची रक्कम उके याने हरिश्चंद्र वानखडे यांना दिलीच नाही.  हे सगळे पैसे प्रवीण उके बँकेतील लिपिक निकिता साबळे व बँक व्यवस्थापक पटेल या तिघांनी संगनमताने हडप केली. वानखडे यांनी लोनची रक्कम वेळोवेळी उके याच्याकडे मागितली. पण, उडवाउडवीची उत्तर देऊन त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. वानखडे यांनी  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वानखडे यांची फसवणूक झाल्याची माहिती  सामाजिक कार्यकर्ते अमोल इंगळे, मनोज व त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजली. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. NZ vs WI : न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचा विक्रम, फक्त एवढ्या बॉलमध्ये ठोकलं शतक या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी बँक व्यवस्थापक, बँक लिपिक निकिता साबळे आणि एजंट प्रविण उके या  तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर उकेसह सर्व आरोपी फरार झाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी पथक पाठवले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या