JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / LOVE, लग्न आणि पलायन! लग्नाच्या 55 व्या दिवशी पळाली नववधू, आधीच केलं होतं Love Marriage

LOVE, लग्न आणि पलायन! लग्नाच्या 55 व्या दिवशी पळाली नववधू, आधीच केलं होतं Love Marriage

लग्न करून सासरी आलेली नववधू (bride) 55 व्या दिवशी प्रियकरासोबत (boyfriend) पळून गेल्याची (run away) घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जोधपूर, 26 ऑगस्ट : लग्न करून सासरी आलेली नववधू (bride) 55 व्या दिवशी प्रियकरासोबत (boyfriend) पळून गेल्याची (run away) घटना समोर आली आहे. या तरुणीनं अगोदरच तिच्या प्रियकरासोबत लग्न (marriage) केलं होतं. मात्र घऱच्यांच्या जबरदस्तीमुळे तिने दुसरं लग्न (second marriage) केल्याचं सांगितलं. हे लग्न तिला मान्य नसल्यामुळे प्रियकरासोबत योजना आखून तिने सासरच्या घरातून पळ काढला. घरच्यांच्या दबावामुळे लग्न राजस्थानच्या जोधपूरमध्ये पूजा आणि पंकज यांचं लग्न 3 जुलै रोजी झालं होतं. या लग्नाला पूजाचा विरोध होता. पूजानं अनेकदा सांगूनही घऱच्यांनी तिचं म्हणणं न ऐकता जबरदस्तीनं पंकजसोबत लग्न लावून दिलं होतं. मात्र पूजाचं लग्न अगोदरच तिच्या ब्रॉयफ्रेंडसोबत झाल्याची माहिती पूजाच्या भावाने दिली आहे. बॉयफ्रेंडसोबतचे संबंध मान्य नसल्यामुळे घरच्यांनी टाकलेल्या दबावाखाली तिने पंकजसोबत लग्न केलं खरं, मात्र पहिल्या दिवसापासून ती घरातून पळ काढण्याचाच विचार करत होती. सासूने दिली माहिती आपली सून लग्न झाल्यापासून सतत घरात बसायची. ती कधीही दरवाजात उभी राहत नसे. मात्र गुरुवारी ती सकाळपासून सारखी दरवाज्याजवळ उभी राहत होती. थोड्या थोड्या वेळाने दरवाजापाशी जात बाहेर पाहत होती आणि पुन्हा आत येत होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला एक गाडी दारात येऊन थांबली. पूजा त्या गाडीत बसली आणि निघून गेली, अशी माहिती पूजाच्या सासूनं दिल्याची बातमी ‘ दैनिक भास्कर ’नं दिली आहे. पोलीस घेतायत शोध पूजाचा पती पंकजनं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पूजा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरू केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरातील सर्व हॉटेल्सनाही पोलिसांनी सतर्क केलं असून शोध सुरु केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या