JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / संतापजनक! 'हुंडा नको' म्हणत केलं लग्न, दीड वर्षांनी आईवडिलांना मिळाला लेकीचा मृतदेह

संतापजनक! 'हुंडा नको' म्हणत केलं लग्न, दीड वर्षांनी आईवडिलांना मिळाला लेकीचा मृतदेह

माहेरच्यांकडून कार घेऊन यावी, यासाठी एका महिलेला सासरच्यांनी जबर मारहाण केल्यामुळे त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 30 डिसेंबर: आम्हाला हुंडा (No Dowry) नको, असं म्हणत लग्न (Marriage) झाल्यावर सासरच्यांंनी (In laws) हुंड्यासाठी सुनेचा छळ (Torture)  सुरू केला आणि अखेर तिचा जीव (Died) घेतला. आपल्या मुलीचं लग्न विना हुंड्याचं होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळालेल्या तिच्या आईवडिलांना मुलीच्या पतीचं खरं रुप समजल्यावर धक्का बसला, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मुलीचा सतत हुंड्यासाठी छळ होत राहिला आणि अखेर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.   विना हुंड्याचं लग्न झारखंडमधील धनबाद परिसरात राहणाऱ्या मोहम्मद मोईन अन्सारी यांची कन्या मंजूम आरा हिचं लग्न मोहम्मद रियाजुद्दीन अन्सारी याच्याशी लावून दिलं होतं. लग्नाची बोलणी करताना आपल्या हुंड्याची कुठलीही अपेक्षा नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात लग्नादिवशी मात्र त्यांनी अल्टो गाडीची मागणी केली. ही मागणी तातडीनं पूर्ण करणं मुलीच्या वडिलांना शक्य झालं नाही. त्यामुळे लग्नाच्या दिवसापासूनच त्यांच्या लेकीचा छळ सुरू झाला.   सतत अत्याचार मुलीनं तिच्या माहेरी जाऊन चारचाकी गाडी घेऊन यावी, यासाठी सासरची मंडळी तिला त्रास देऊ लागली. काही दिवसांनी तर प्रकरण हाणामारीवर जाऊ लागलं. याची कल्पना मंजूमनं तिच्या वडिलांना दिल्यानंतर त्यांनी तिला माहेरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवायलाच नकार दिला. जोपर्यंत गाडी मिळत नाही, तोपर्यंत अंजूमला माहेरी पाठवणार नाही, असा पवित्रा मंजूमच्या पतीनं घेतला.   पोलिसांत तक्रार मात्र फायदा नाही मंजूमच्या वडिलांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पोलिसांनी त्यांना त्यांचाच दोष असल्याचं सांगितलं आणि परत पाठवलं. एसपींनाही वडील जाऊन भेटले, मात्र त्यांनीदेखील काहीच प्रतिसाद दिला नाही.   सुनेचा मृत्यू घटनेच्या दिवशी सुनेला जबर मारहाण झाल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला सासरच्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सासरची मंडळी हॉस्पिटल सोडून पळून गेली. त्यांनी माहेरच्यांना फोन करून तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं कळवलं. तिचे वडील हॉस्पिटलला पोहोचले असता, आपल्या मुलीचं निधन झाल्याचं त्यांना समजलं. ते ऐकून त्यांना जबर मानसिक धक्का बसला.   हे वाचा -

पोलीस तपास सुरू मंजूमला जबर मारहाण झाल्याचं तिचा चेहरा आणि शरीरावरील खुणांवरून दिसून येत आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या