यवतमाळ, 10 नोव्हेंबर : यवतमाळ (Yavatmal crime) येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या (Doctor Killed) केल्याचा धक्कादायक प्रकार (Shocking News) समोर आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. डॉ अशोक पाल असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. अद्याप हत्येचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. (Murder of medical college student doctor in Yavatmal) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हत्येनंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थ्यांकडून संताप केला जात आहे. परिसरात विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे. बातमी अपडेट होत आहे.