JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / चप्पल घालून घरात घुसला म्हणून केलं संतापजनक कृत्य, हादरवणारी घटना

चप्पल घालून घरात घुसला म्हणून केलं संतापजनक कृत्य, हादरवणारी घटना

प्रेम नावाचा व्यक्ती हा 10 वर्षांपासून गावातच एका कुटुंबाच्या घरी काम करत होता.

जाहिरात

धक्कादायक घटना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिमांशु नारंग, प्रतिनिधी करनाल, 5 जुलै : भारतीय राज्यघटनेपासून शालेय पुस्तकांपर्यंत सर्वांना समानतेचा अधिकार सांगितला जातो. पण आजही समाजात काही धक्कादायक घटना समोर येतात. त्यामागे देशात खरेच सर्वांना समानतेचा अधिकार आहे का? हा प्रश्न समोर येतो. अशीच एक धक्कादायक घटना कर्नालमध्ये समोर आली आहे. तेथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. प्रेमचंद असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्या प्रकरणानंतर कर्नालच्या चुरणी गावात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम नावाचा व्यक्ती हा 10 वर्षांपासून गावातच एका कुटुंबाच्या घरी काम करत होता. प्रेम हा चप्पल न काढता काम करत असलेल्या घरात गेला होता. याच कारणावरून त्याला बेदम मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

मृताच्या मुलाने सांगितले की, मारहाणीनंतर जेव्हा त्याचे वडील शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी सांगितले की, तो चप्पल घालून मालकाच्या घरात घुसला होता आणि त्यामुळेच त्याला मारहाण करण्यात आली. मारामारीनंतर त्यांनी आरोपींना प्रेमला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन देण्याची मागणीही केली होती. मात्र, वाहनही देण्यात आले नाही. यानंतर कुटुंबीयांनी प्रेमला कर्नाल येथील रुग्णालयात नेले. तेथून त्याला चंदिगड पीजीआयमध्ये रेफर करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून महिलेसह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. तसेच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या