JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 4 मुलांच्या आईकडून 23 वर्षांनी लहान प्रियकराची हत्या; शेवटी Live-in पार्टनरचाही भांडाफोड

4 मुलांच्या आईकडून 23 वर्षांनी लहान प्रियकराची हत्या; शेवटी Live-in पार्टनरचाही भांडाफोड

धक्कादायक म्हणजे प्रियकाची हत्या करून महिला शेजारील घरात जाऊन झोपून गेली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 2 फेब्रुवारी: इंदूरमध्ये लव्ह ट्रायअँगलमध्ये (Love Triangle in Indore) एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 55 वर्षीय महिलेने 23 वर्षे लहान प्रियकराची हत्या (Killed Boyfriend) केली. आरोपी महिलेला 4 मुलं आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. मृत तरुण आणि महिलेमध्ये तिच्या लिव्ह इन पार्टनरवरुन वाद झाला होता. ज्यानंतर महिलेने वीट उचलून प्रियकराच्या डोक्यात मारलं. यात त्याचा मृत्यू झाला. ACP राजीव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार नगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. ज्याचं नाव दीपक (32) असल्याचं समोर आलं आहे. डोक्यात जखमेचे व्रण दिसल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. नातेवाईकांच्या मदतीने पोलीस महिलेपर्यंत पोहोचले. शेवटी आरोपी महिलेला अटक करून तिची चौकशी करण्यात आली. तिने सांगितलं की, 26 जानेवारी रोजी ती दीपकसोबत होती. त्यावेळी लिव्ह इन पार्टनर गणेशदेखील आला होता. त्यावेळी तिघांमध्ये वाद झाला. यानंतर गणेश निघून गेला. हे ही वाचा- हिंगोलीत गर्भवती महिलेसोबत डॉक्टरचं घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी घेऊन गेला अन्… प्रियकरावर हल्ला करून झोपली, आणि… दीपकने दारूच्या नशेत मंगलावरुन गणेशसोबत वाद केला. त्याने हातात घातलेल्या कड्याने महिलेला मारहाण केली. मंगलानेदेखील रागाच्या भरात वीट उचलून त्याच्या डोक्यावर आघात केला. यानंतर ती जवळच तयार केलेल्या झोपड्यात जाऊन झोपली. सकाळी आपल्या घरी निघून गेली. जेव्हा तिला दीपकच्या मृत्यूची माहिती मिळाली, तर ती आपल्या चारही मुलांना सोडून बाहेर निघून गेली. पोलिसांनी जेव्हा मंगलाविषयी माहिती जमा केली तर कळालं की, मंगलाला चार मुलं आहे. तिच्या पतीच काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ती गणेश नावाच्या तरुणासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. दोघेही मजुरी करीत होते. काही दिवसांपूर्वीच ती दीपकच्या संपर्कात आली होती.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या