अमित राय, मुंबई 01 ऑक्टोबर : दिवसाढवळ्या घराची रेकी करून त्यानंतर फ्लॅटमध्ये घुसून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तूंची लूट करणाऱ्या एका महिलेला मुंबईतील बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेला कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून 8 लाख 35 हजार किमतीचे सोन्याचे दागिने भरलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. शीतल अरुण उपाध्याय (36) असं आरोपी महिलेचं नाव असून तिच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. Palghar Police : अखेर बेपत्ता मुलीचा शोध लागला; वडिलांनी माहिती न देता पोलिसांनी शोधले बोरिवलीचे वरिष्ठ पीआय निनाद सावंत यांनी सांगितलं की, बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगर येथील दीप सोसायटीमध्ये राहणारी एक परदेशी महिला 24 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आली असता, ती काही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. सामान गेले. त्या विदेशी महिलेची मोठी आई घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपली होती. त्याचवेळी आरोपी महिलेनं घरात प्रवेश करून महिलेच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे साडेआठ लाख किमतीचे दागिने लंपास केले.
महिला घरी परतली तेव्हा महिलेची बॅग गायब होती. महिलेच्या तक्रारीनंतर बोरीवली पोलिसांचे तपास अधिकारी एपीआय रतीलाल तडवी, पोलीस हवालदार किरण दळवी, सतीश सावंत यांच्या पथकाने परिसरात तपास सुरू केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. त्यात सदर चोर महिला जाताना दिसली. पोलिसांनी त्या महिलेचा फोटो काढून तो व्हायरल केला असता फोटोत असलेली महिला ही विनोवा भावे नगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. शीतल अरुण उपाध्याय असं तिचं नाव आहे. मुलं चोरणारा समजून शेकडो लोकांनी त्याला घेरलं अन्.., ठाण्यातील धक्कादायक घटनेचा Video बोरिवली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्या भागातील महिलेला अटक केली, अटकेनंतर पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा टाकून सुमारे 8 लाख 35 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, सदर महिला ही चोर आहे. दिवसाढवळ्या ही महिला उघड्या असलेल्या घरावर लक्षण ठेवते. त्या घरात प्रवेश केल्यानंतर महिला मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन पळून जाते. सध्या या प्रकरणात तिला अटक केल्यानंतर ती कुठे सोनं विकायची याची माहिती गोळा करण्यात पोलीस गुंतले आहेत.