JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कर्जबुडव्या नीरव मोदींच्या महागड्या वस्तूंचा लिलाव, कोट्यवधी रूपये वसूल

कर्जबुडव्या नीरव मोदींच्या महागड्या वस्तूंचा लिलाव, कोट्यवधी रूपये वसूल

पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला (Nirav Modi) आणखी एक दणका बसला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जून : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला (Nirav Modi) सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीनं (ED) दणका दिला आहे. ईडीनं मुंबईत नीरव मोदीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव आयोजित केला होता. दोन दिवस झालेल्या या लिलावात (Auction)  फरार व्यापारी नीरव मोदीकडून (Fugitive Businessman Nirav Modi) जप्त करण्यात आलेल्या लक्झरी वस्तूंची (Luxury Items) विक्री केली गेली. या विक्रीतून 2.71 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती सेफ्रोनर्ट या ऑक्शन हाउसच्या (Saffronart Auction House) अधिकाऱ्यांनी दिली आहे. नीरव मोदी हा फसवणूक, भ्रष्टाचार, मनी लाँड्रिंगसारखे विविध आरोप ठेवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत सीबीआय आणि ईडीने (Directorate of Enforcement) त्याच्या भारतातील विविध मालमत्तांवर कारवाई करत त्या जप्त केल्या आहेत. ही मालमत्ता आणि इतर महागड्या वस्तूंचा लिलाव करून काही प्रमाणात घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोणत्या वस्तूंचा समावेश? 1 आणि 2 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लिलावात 27 लॉटचा समावेश होता. लिलाव झालेल्या वस्तूंमध्ये दुर्मिळ आणि महागडी घड्याळं, पेंटिंग्ज आणि डिझायनर हँडबॅग्जचा समावेश होता. ‘आम्ही ठेवलेल्या लिलावात 100 टक्के लॉटची विक्री होऊन ‘व्हाईट ग्लोव्ह’ साध्य झाल्याचं पाहून आम्हाला आनंद झाला आहे,’ असं सेफ्रोनार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक दिनेश वझिरानी (Dinesh Vazirani) म्हणाले. विविध श्रेण्यांमध्ये जगभरातून चांगली स्पर्धात्मक बोली लावली गेली. बहुतेक लॉट त्यांच्या लिलावापूर्व अंदाजापेक्षा चांगल्या किमतीला विकले गेले, असंही ते म्हणाले. डेसमंड लाझारो पेंटिंग 22 लाख 38 हजार 656 रुपयांना विकलं गेलं. त्याला साधारणपणे सहा ते आठ लाख रुपायांची बोली लागेल असा अंदाज होता. पण ते तिप्पट किमतीत विकलं गेलं. हर्मीस, शेनेल, लुई व्हिटॉन, बोटेगा व्हेनेटा आणि गोयार्ड सारख्या लक्झरी ब्रँडच्या बॅगदेखील लिलावाचा भाग होत्या. यापैकी पॅलेडियम हार्डवेअर आणि स्कार्फ असलेली हर्मिस केली ब्लू अ‍ॅटोल या बॅगला 12 लाख 91 हजार 360 रुपयांची सर्वाधिक बोली लागली. सोन्याचं आवरण असलेली लेदर हर्मीस बिर्किन बॅग (Hermes Birkin Bag) 11 लाख 9 हजार 920 रुपयांना विकली गेली. बर्किन बॅग्ज त्यांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे सर्वांत जास्त मागणी असलेल्या फॅशन अ‍ॅक्सेसरीजपैकी एक आहेत. प्रत्येक बर्किन बॅग हाताने शिवलेली, बफ केलेली, पेंट केलेली आणि पॉलिश केलेली असते. रेस्टॉरंट्सने ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज आकारणं बेकायदेशीर; ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला इथे तक्रार करण्याचा सल्ला शेनेल ब्रँडची एक फ्लॅप बॅग आणि प्राण्यांचे कातडे व चांदीच्या टोन हार्डवेअरमधील एक मोठी क्लासिक हँडबॅग चार लाख 80 हजार 256 रुपयांना विकली गेली. आणखी एक सोन्याची ट्वीड डबल फ्लॅप शेनेल (Chanel)बॅग एक लाख 89 हजार 818 रुपयांना विकली गेली आणि क्लारा कासाविना सिल्व्हर रोझली क्लच एक लाख 56 हजार 621 रुपयांना विकला गेला. रोझली(The Rosalie) क्लचला स्वारोवस्की स्फटिकांनी भरलेला एक फुलांचा मिनाडियर आणि हाताने शिवलेले रेशीम अस्तर लावलेले आहे. ‘काळाच्या ओघात विशेषत: गेल्या दोन वर्षांत, या उत्कृष्ट हस्तकला असलेल्या वस्तूंची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे त्यांचं मूल्य कमालीचं वाढत आहे. 2019 पासून क्लासिक शेनेल फ्लॅप बॅगची किंमत 60 टक्क्यांनी वाढली आहे. हे ब्रँड खरेदीदारांना गुंतवणुकीचा उत्तम पर्याय देतात,’ असे वझिरानी म्हणाले. LIC King राजेंद्र बंबकडे आणखी 2.5 कोटींचं घबाड, बँकेतील लॉकर तपासणीत धक्कादायक माहिती समोर बी. विठ्ठल यांची निर्मिती असलेल्या कांस्य गणेश मूर्तीला 6 लाख 58 हजार 560 रुपयांची किंमत मिळाली. लिमिटेड एडिशन प्रकारातील घड्याळं आणि हँडबॅग यांच्या जगभरातील लक्झरी मार्केटमध्ये होणाऱ्या लिलावांत फ्रेंझिड बिडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आम्हाला दिसून आलं आहे, असं वझिरानी म्हणाले. 27 क्रमांकाच्या लॉटवर 90 लाख 49 हजार 600 रुपयांची सर्वोच्च बोली लागली. या लॉटमध्ये एक पॅटेक फिलिपी नॉटिलस (Patek Philipe Nautilus) ब्रँडचं गोल्ड आणि डायमंड घड्याळ होतं. तर, दुसरी सर्वोच्च बोलीदेखील घड्याळासाठीच लागली. येइगर लिक्युल्टर (Jaeger-Lecoultre) ब्रँडच्या लिमिडेट एडिशन घड्याळाला 89 लाख 49 हजार 517 रुपये किंमत मिळाली. या दोन्ही घड्याळांसाठी अंदाजे 55 ते 70 लाख रुपये मिळतील असा अंदाज होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या