मुंबई, 01 जानेवारी: अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी मुंबईतील प्रतिक्षानगर परिसरात समोर आला. या प्रकरणी एक इलेक्ट्रिशियनला ताब्यात घेण्यात आलं आहे. वडाळा टीटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायनच्या प्रतीक्षानगर परिसरात आरोपी सुशील चंदोरकार राहातो. 11 वर्षीय पीडित मुलीच्या घरात वीजेचं काम करण्यासाठी आरोपी सुशील घरी तिच्या घरी गेला होता. त्याच दरम्यान घरातील सदस्य बाजारात गेले असल्यानं घरी 11 वर्षांची मुलगी एकटीच होती. याचा फायदा घेऊन आरोपी सुशीलने संधी साधली. ‘आरोपी सुशीलने घरी कोणी नाही हे पाहून सुरुवातील पीडित मुलीसोबत संवाद साधला. नंतर त्याने आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवले. आई-वडिल जेव्हा घरी आले तेव्हा पीडित मुलगी रडत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानंतर पीडित मुलीनं सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. पीडितेनं सांगितलेल्या घटनेनंतर आई-वडिलांना आरोपी सुशीला पकडून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं.’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हेही वाचा- धक्कादायक! आईसह 18 महिन्याच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत सापडला मृतदेह वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र भोबे यांनी आरोपी 36 वर्षांचा आरोपी सुशील चंदोरकर विरोधात कलम 354 आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अनोळखी व्यक्तींसोबत आपल्या मुलांना एकटं सोडू नये असं वारंवार आवाहन करूनही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनीही पालकांना अशा घटना घडू नयेत यासाठी आपल्या पाल्यांनी विशेष काळजी आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. हेही वाचा- लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यांतच तरुणाची आत्महत्या, पुण्यात बायकोविरोधात गुन्हा