JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / लग्नाचा वाढदिवस विसरला, मुंबईचा नवऱ्यासोबत पत्नीचं भयानक कृत्य, माहेरच्यांना बोलावलं अन्...

लग्नाचा वाढदिवस विसरला, मुंबईचा नवऱ्यासोबत पत्नीचं भयानक कृत्य, माहेरच्यांना बोलावलं अन्...

मुंबईतल्या घाटकोपर भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 27 वर्षांच्या महिलेने लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून नवऱ्यासोबत भयानक कृत्य केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 फेब्रुवारी : मुंबईतल्या घाटकोपर भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 27 वर्षांच्या महिलेने लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून नवऱ्यासोबत भयानक कृत्य केलं आहे. या महिलेने आपला भाऊ, आई-वडिलांना बोलवून घेवून नवरा आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केली आहे. हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना 18 फेब्रुवारीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवरा लग्नाचा वाढदिवस विसरला, यानंतर भडकलेल्या पत्नीने तिचे आई-वडिल, भावाला सासरी बोलावलं. माहरेचे घरी आल्यानंतर त्यांनी मुलीचा पती आणि सासूला मारहाण करायला सुरूवात केली. एवढच नाही तर त्यांच्या वाहनाचंही नुकसान केलं. याप्रकरणी चार आरोपींवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती घाटकोपर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय दहाके यांनी दिली. पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावली असून याप्रकरणी चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांच्या माहितीनुसार 32 वर्षांचा पीडित विशाल नांगरे कुरियर कंपनीत ड्रायव्हर आहे, तर पत्नी कल्पना फूड आऊटलेटमध्ये काम करते. हे दोघं बैगनवाडी गोवंडीमध्ये राहतात, तसंच दोघांचं लग्न 2018 साली झालं आहे. कल्पनाचे आई-वडील आणि भाऊ चर्चा करण्यासाठी तिच्या सासूच्या घरी आले होते, यावेळी रात्री 9.30 च्या सुमारास कल्पनाने तिच्या सासूच्या कानशिलात लगावली. यानंतर वाद वाढला आणि दोघांना मारपीट करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर नांगरे आणि त्यांची आई राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले. मेडिकल रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनी घाटकोपर पोलिसांना संपर्क केला. पत्नीच्या भावाने आपल्या हाताचा आणि चेहऱ्याचा चावा घेतल्याचा आरोपही पतीने केला आहे. घाटकोपर पोलिसांनी पत्नी तिचे आई-वडील आणि भावाविरोधात कलम 323, 324, 327, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या