JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Mumbai hostel Crime : मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट..

Mumbai hostel Crime : मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट..

mumbai hostel rape and murder: मुंबईतील एका वसतिगृहात बलात्कार आणि हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मात्र पोलिसांसाठीही हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले कारण संशयित असलेल्या गार्डचा मृतदेहही रेल्वे रुळावर आढळून आला आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जून : चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. संबंधित मृत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर वसतिगृहात कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळळी आहे. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकरण? मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळाली होती की सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृतावस्थेत आढळली असून तिच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची समोर आले आहे. वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. संशयित सुरक्षारक्षक बेपत्ता झाला होता. या सुरक्षा रक्षकाने तरुणीच्या हत्येनंतर रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. तपासात धक्कादायक गोष्टी समोर महिला वॉर्डनचा दावा आहे की त्यांना योग्य सुरक्षा हवी होती. पण सरकारने दिली नाही. कोविडच्या काळात सरकारने पुरुष स्टाफची कपात केली होती. पीडित मुलीची रूममेट होती. पण तिनं परीक्षा संपल्यानंतर वसतिगृहाची खोली सोडली. मुलींच्या वसतिगृहात महिला मदतनीस का नव्हत्या? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मरीन लाईन वसतिगृहात वॉर्डन या प्राध्यापिका आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या 17 वर्षांपासून त्यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. वाचा - प्रेम, धर्मांतर अन् निकाह… 4 मुलांनंतर धोका, न्यायासाठी भटकतेय पीडित महिला मुलीच्या प्रायव्हेट पार्ट आणि मानेवर जखमा प्राथमिक तपासात मुलीच्या मानेवर व गुप्तांगावर जखमेच्या खुणा आढळल्याने या मुलीवर बलात्कार करून खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ओमप्रकाश कनोजियाविरुद्ध भादंवि कलम 302 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत आरोपी विवाहित असून त्याला 12 वर्षांची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या