प्रमोद पाटील (मुंबई), 04 जानेवारी : मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीमध्ये मागच्या दिड महिन्यापूर्वी थांबून असलेल्या ऑडी कारमध्ये एक मृतदेह आढळून आला होता. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा खिंड येथे या गाडीत मृतदेह सापडला होता. दरम्यान हा घातपात की आत्महत्या यावर जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पुण्यात दोघांना अटक केली आहे. मुंबई - गोवा महामार्गावर ऑडीमध्ये खून करून मृतदेह ठेवलेल्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
तब्बल 45 दिवसानंतर संजय कार्ला हत्येतील आरोपींना पकडण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पुण्यावरून दोघांना अटक केली आहे. संजय कार्ला याचा खून करून आरोपी नेपाळमध्ये पळाले होते. कमी किमतीमध्ये सोने देतो असं सांगून फसवणूक करण्याचा मृत इसमाचा उद्देश असल्याची माहिती समोर आली आहे. हा उद्देश लक्षात आल्याने आरोपीनी त्याच्याच पिस्तूलने पाच गोळ्या झाडात संजय कार्लेची हत्या केल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
हे ही वाचा : अंजली फुल नशेत गाडी चालवत होती, पण.. मैत्रीणीने सांगितली घटनेची आपबिती
मोहसीन मुल्लाणी आणि अंकित कांबळे अशा दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत इसम आणि दोन्ही आरोपी साऱ्हाईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींवर पाच तर मृत व्यक्तीवर 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. दोन्ही आरोपी आणि वापरात आलेली पिस्तूल पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोण आहे संजय कार्ले
संजय कार्ले हा सोन्याची बनावट नाणी विकून अनेकांची फसवणूक करायचा. संजयवर अनेक गुन्हे दाखल झाल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत ही होता. सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या हत्येचीच बातमी समोर आल्याने खळबळ उडाली होती.
हे ही वाचा : कवटी फुटलेली, ब्रेन मॅटर गायब, शरीरावर 40 जखमा आणि…; अंजलीच्या ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
डुप्लीकेट गोल्डन कॅाईन देवून लोकांना फसवणूक करण्याच्या प्रकरणी तो सवयीचा गुन्हेगार होता असेही समजते. बंद गाडीत मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह संजय कार्लेचा असल्याची माहिती आहे. संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी होता.