JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मुलाच्या हव्यासापोटी आईनेच केली चार मुलींची चाकूने हत्या; दोन महिन्यांनंतर झाली अटक

मुलाच्या हव्यासापोटी आईनेच केली चार मुलींची चाकूने हत्या; दोन महिन्यांनंतर झाली अटक

आरोपी महिलेच्या पतीने त्याची पत्नी फरमीनाने आपल्या चार अल्पवयीन मुलींची झोपेतच चाकूने गळा चिरून हत्या केल्याची तक्रार दाखल केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नूंह, 10 फेब्रुवारी : जवळपास अडीच महिन्यांपूर्वी पिपरोली गावात एका आईने आपल्या चार अल्पवयीन मुलींची हत्या करून स्वत: चा गळा कापण्याबाबत खुलासा केला आहे. पोलिसांनी आरोपी आई फरमीनाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीने त्याची पत्नी फरमीनाने आपल्या चार अल्पवयीन मुलींची झोपेतच चाकूने गळा चिरून हत्या केल्याची तक्रार दाखल केली. हरियाणातील पिपरोली गावात ही घटना घडली. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली सुरू केली. घटनास्थळावरून चाकू आणि इतर सामान ताब्यात घेण्यात आलं आहे. या हत्येबाबत खुर्शिदच्या पत्नीने खुलासा केला असून, तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

(वाचा -  पुण्याच्या रस्त्यावर थरार, गोल्डमॅन सचिन शिंदेची गोळ्या झाडून हत्या )

आरोपी दोन महिन्यांपासून रुग्णालयात दाखल - चार मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी आईने स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला. स्वत:चा गळा कापण्याचा प्रयत्न केल्याने यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांपासून महिला रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती होती. आयसीयूमध्ये असल्याने आणि तिची तब्येत गंभीर असल्याने पोलीस तिचा जबाब घेऊ शकले नव्हते.

(वाचा -  ट्रकच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू, हादरवून टाकणारा CCTV VIDEO )

चार मुलींनंतरही मुलगा न झाल्याने छळ होत असल्याने महिलेने चार मुलींची भाजी कापण्याच्या चाकूने गळा चिरून हत्या केली. मुलींच्या हत्येनंतर महिलेने स्वत:चाही गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी प्राथमिक तपासात, पतीच्या तक्रारीनुसार, जखमी महिलेविरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या