विजय कमळे पाटील, जालना 31 डिसेंबर : जालन्यात आई आणि 18 महिन्याच्या मुलासह विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. स्वाती नानासाहेब ढाकणे 24 वर्ष व निखील नानासाहेब ढाकणे 18 महिने अशी मृतांची नावं आहेत. बदनापूर तालुक्यातील अनवी परिसरात घटना घडलीय. सासरच्या लोकांनी खून केल्याचा माहेरच्या लोकांनी आरोप केलाय. मात्र कारण अद्याप कळू शकलेले नाहीये. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय. चंदनझीरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आता सर्व अंगांनी चौकशी करण्याची शक्यता आहे. आई आणि मुलीचा मृतदेह मिळाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस पीडीत महिलेच्या पती आणि इतर कुटुंबीयांचीही चौकशी करणार आहेत. पीडीत मुलीच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. देशभर महिलांवरच्या अत्याचारावरून असंतोष निर्माण झालाय. पण अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झालेली नाहीये. दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैदराबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहीत करणारा ठरत असल्याचे म्हटले आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. पुण्यात संग्राम थोपटेंचे कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेस भवन फोडलं त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगविना पडून आहे. हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही, 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे चिंता व्यक्त करण्यात येतेय.