मलकापूर, 29 जुलै : दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलिसात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वयं भु राष्ट्र संत म्हणून बिरुदावली मिरवणारे एकनाथ महाराज यांचं अध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. सामान्यांपासून ते राजकारण्यांमध्ये महाराजांची कायम उठबस असते. सत्ताधारी असो की विरोधक, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक येत असतात. महाराजांचे अध्यात्मिक क्षेत्रात जेवढे नाव तेवढे त्यांचे पराक्रम देखील आहेत. लोमटे यांच्या विरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. हेच महाराज यांनी काल महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराज यांनी पीडित महिलेला दिल्याची माहिती समोर आली आहे. या पीडितेच्या तक्रारीवरून लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाले आहेत. महाराजांची बदनामी करण्याच्या हेतूने हे सर्व सुरू असल्याचं त्यांचे लहान बंधू यांनी दावा केला आहे. बुवा भोंदू महाराज यांच्या भानगडी महाराष्ट्राला नव्या नाहीत. सुरुवातीला भक्तांवर भुरळ पाडून हे महाराज आपलं प्रस्थ वाढवतात आणि त्यानंतर गैरकृत्य करत असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे.