जोधपूर, 30 जानेवारी : सुसाइड (Suicide) करण्यासाठी 19 वर्षीय मॉडेलने हॉटेलच्या गच्चीवरुन उडी मारल्याचा प्रकार समोर आला (Rajasthan News) आहे. ही तरुणीचं नाव गुनगुन उपाध्याय आहे. गंभीर अवस्थेत तिला जोधपूरच्या मथुरा दास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना रातानाडा भागातूल आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रकृती गंभीर आहे. (Model jumped from the roof of a hotel in Jodhpur, Fracture in the leg with the chest of a young woman) मॉडेलच्या चेस्टसह पायालादेखील फ्रॅक्चर झालं आहे. उंचावरुन पडल्यामुळे खूप जास्त रक्तस्त्राव झाला आहे. तिला रक्तदेखील चढवण्यात आलं आहे. अद्याप ती बेशुद्धच आहे. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही. हे ही वाचा-
पत्नीने पतीला चहातून दिलं विष; रुग्णालयात गंभीर अवस्थेतही बायकोसाठी गहिवरला!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुनगुन उपाध्याय हिने हॉटेल लॉर्डच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळीच ती उदयपूरहून आली होती.
गुनगुन मॉडलिंग करते. तर तिचे वडील बाजारात व्यवसाय करतात. रातानाडा सीआय चतुराराम यांनी सांगितलं की, गुनगुनची प्रकृती गंभीर आहे. आता ती काहीच सांगण्याच्या स्थितीत नाही.