JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / काय चाललंय काय? केवळ चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला मारहाण, गाडीला बांधून वीजेचा शॉक

काय चाललंय काय? केवळ चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला मारहाण, गाडीला बांधून वीजेचा शॉक

एका अल्पवयीन मुलाने मोबाईलची चोरी केल्याच्या आरोपावरून जमावाने त्याला मारहाण (Mob beat minor boy and give him electric shock) करत वीजेचा शॉक दिल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पटना, 25 सप्टेंबर : एका अल्पवयीन मुलाने मोबाईलची चोरी केल्याच्या आरोपावरून जमावाने त्याला मारहाण (Mob beat minor boy and give him electric shock) करत वीजेचा शॉक दिल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या मुलाने एका नागरिकाचा मोबाईल चोरला, असा आरोप (boy beaten for the doubt of mobile theft) त्याच्यावर करण्यात आला. त्यानंतर जमावाने या अल्पवयीन मुलाला पकडून गाडीला बांधलं आणि त्याला मारहाण केली. केवळ संशयावरून मारहाण बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला. हा मोबाईल पीडित अल्पवयीन मुलानेच चोरला असल्याचा संशय काहीजणांना आला. सत्य समजून घेण्याआधीच तिथे गोळा झालेल्या जमावाने अल्पवयीन मुलावर चोरीचा आळ घेतला. संतप्त जमावाने या मुलाला अगोदर गाडीला बांधले आणि मारहाण केली. त्यानंतर या मुलाला वीजेचा शॉक देण्याची कल्पना जमावातील एकाला सुचली आणि इतरांनी त्याला पाठिंबा दिला. गाडीला बांधलेल्या या मुलाला वीजेचा शॉक देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. पोलिसांची धाव ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाच्या तावडीतून त्यांनी मुलाला सोडवलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. या प्रकारामुळे हा मुलगा घाबरला होता आणि त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. या मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या पालकांकडे सोपवलं आहे. हे वाचा - क्रूर! माहेरवाशीण महिलेनं केली धाकट्या बहिणीची हत्या, घरातच केलं दफन जमावाविरोधात तक्रार आपल्या मुलाला विनाकारक मारहाण केल्याप्रकरणी या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे जमावातील नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना म्हणजे समाजात वाढलेल्या हिंसक प्रवृत्तीचंच निदर्शक असल्याची चर्चा सध्या मुजफ्फरपूरमध्ये सुरू आहे. या मुलाने चोरी केली आहे की नाही, हे समजूनही न घेता जमावाने त्याच्यावर अत्याचार केल्यामुळे हा मुलगा घाबरला असून त्याच्यावर त्याचे कुटुंबीय अधिक उपचार करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या