लखनऊ, 17 जून: गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचं (Crime) प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा (Minors) सहभाग वाढल्याचं दिसून येत आहे. अल्पवयीन आणि तरुण मुलांमध्ये पब्जी या गेमविषयी (PUBG Game) विशेष आकर्षण आहे. सतत हा गेम खेळल्यानं त्याचा परिणाम या मुलांच्या मानसिकतेवर झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे या मुलांकडून गुन्हेगारी कृत्यदेखील होत आहेत. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सध्या असंच एक प्रकरण विशेष चर्चेत आहे. एका अल्पवयीन मुलानं त्याच्या आईची हत्या (Murder) केली आहे. सध्या या मुलाची बाल सुधारगृहाच्या पथकाकडून (Squad of Juvenile Correctional Institution) चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान नवी माहिती समोर आली आहे. `आज तक`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं त्याच्या आईची हत्या केली. या प्रकरणामागील कहाणी आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. सध्या बाल सुधारगृहाचं पथक या मुलाची चौकशी करत आहे. आता या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख आला असून, त्याच्यामुळे या हत्याकांडाची रूपरेषा तयार केली गेल्याचं चौकशीमधून समोर आलं आहे.
जमीन अन् बहीण यात भावाने केली निवड; जीव जाईपर्यंत स्वत:च्या ताईवर केले वार
माझ्या आईला एक प्रॉपर्टी डिलर (Property Dealer) भेटायला येत असे. त्याला पाहिलं की मला खूप वाईट वाटायचं. एक दिवशी ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली. त्यानंतर आई आणि वडिलांचं कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर माझ्या आईनं मला खूप मारलं. यामुळे माझ्या मनात चीड निर्माण झाली,`` असं आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलानं चौकशीदरम्यान सांगितलं.
बाल सुधारगृहाच्या पथकानं या अल्पवयीन आरोपीला काही प्रश्न विचारले असता या प्रकरणात काही नवे खुलासे समोर आले. आईला मारत असताना तुला भीती वाटली नाही का, असा प्रश्न पथकानं विचारला. त्यावर आरोपी म्हणाला, ‘मला भीती वाटली नाही. भीती वाटली असती तर मी तिच्यावर गोळी झाडली नसती.’ तुला कोण व्हायचं आहे?, या प्रश्नावर आरोपीनं मला राजकारणी (Politician) व्हायचं आहे,असं उत्तर दिलं. तुला कोणता पदार्थ आवडतो, असा प्रश्न विचारला असता, मला अंडाकरी खूप आवडते आणि मी सुधारगृहात तीच ऑर्डर करतो, असं आरोपीनं सांगितलं. तुला गर्लफ्रेंड आहे का, या प्रश्नावर आरोपीनं हो, मला चार गर्लफ्रेंड आहेत, असं हसत उत्तर दिलं.
सुधारगृहाच्या पथकानं तुला फोन वापरायला आवडतो का असा प्रश्न विचारला असता, आरोपीनं थोडा फार आवडतो असं उत्तर दिलं. तुला जेलमध्ये जाण्याची भीती वाटते का या प्रश्नावर आरोपीचं उत्तर धक्कादायक होतं. ``मला जेलमध्ये जायची भीती वाटत नाही. कारण तिथं केवळ तीन वर्षंच राहायचं आहे,`` असं आरोपी म्हणाला. तुझ्या घरी कोण-कोण येत असे, असा प्रश्न विचारला असता, आरोपी म्हणाला, ‘माझ्या घरी इलेक्ट्रिशियन काका आणि प्रॉपर्टी डिलर काका येत होते. मला हे अजिबात आवडत नव्हतं.’ या विषयी तू तुझ्या वडिलांना सांगितलंस का, या प्रश्नावर तो म्हणाला, ‘हो. मात्र त्यानंतर आई-वडिलांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर आईनं मला खूप मारलं होतं.’ मग तू काय केलंस असा प्रश्न विचारला असता, आरोपी म्हणाला, ``मी एक दिवस फोनवर आई आणि काकांचं बोलणं ऐकलं होतं. ते खासगी विषयावर बोलत होते.`` तुझ्याकडे फोन होता का असा प्रतिप्रश्न विचारला असता आरोपीनं सांगितलं की माझ्याकडे फोन नव्हता. मी आईचा फोन चोरून घेत होतो आणि कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) ऐकतहोतो. ऐकलेल्या सर्व गोष्टी वडिलांना सांगत होतो. यावर तुला जर या गोष्टींमुळे राग येत असेल तर तुझ्या मनात जे येईल ते कर, असं मला वडील सांगत.
तुला पिस्तुलाविषयी माहिती कोणी दिली, असा प्रश्न विचारला असता, आरोपी म्हणाला, ‘माझे वडिल माझ्यासमोर पिस्तुल साफ करायचे आणि पिस्तुल (Pistol) कुठे ठेवलंय हे त्यांनी मला सांगितलं होतं. एके दिवशी प्रॉपर्टी डिलर काका माझ्या घरी जेवायला आले आणि घरीच थांबले. त्यावरुन माझ्या आई-वडिलांचं भांडण झालं. त्या दिवशी आईनं मला जेवायला दिलं नाही आणि मला मारहाण केली.’ यावर वडिलांनी तुला काय सांगितलं असा प्रश्न विचारला असता, तुला जे वाटतं ते तू कर. मी काहीच करू शकत नाही. मी असहाय्य आहे पण तू नाही, असं वडिलांनी सांगितल्याचं आरोपी म्हणाला.
Shocking! भाजप नेत्याची पत्नीवर गोळी झाडून आत्महत्या; कमरेला काडतुसांचा बेल्ट
चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीनं सांगितलं, एके दिवशी आई बाहेर गेली असता काका घरी आले. त्यावेळी आई दोन दिवसांसाठी बाहेर गेली होती. वडिलांना माझा मुद्दा लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला आजीकडं पाठवलं. त्यावेळी आईदेखील बाहेर होती मग वडिलांना सगळा प्रकार कळाला. या सर्व प्रकारामुळे तुझ्या वडिलांना राग आला होता का, असा प्रश्न विचारला असता, आरोपी म्हणाला,‘वडिलांना खूप राग आला. त्यानंतर आई-वडिलांचं भांडण झालं. त्यावेळी आईनं रागाच्या भरात घरातल्या सर्व काचा फोडल्या आणि मला काठीनं मारहाण केली.’
प्रॉपर्टी डिलर काका जेव्हा घरी यायचे, तेव्हा तू आणि तुझी बहीण (Sister) कुठे जायचात, असा प्रश्न विचारला असता, आम्ही दोघं एका खोलीत तर ते आणि आई दुसऱ्या खोलीत असायचे. माझ्याकडे फोन नसल्याने मी बाहेर जाऊन वडिलांना फोन करायचो. आई मला स्कूटी देत नव्हती; पण मी बळजबरीनं स्कूटी घेऊन जायचो. त्यावरून आई मला मारत होती,’ असं आरोपी म्हणाला. वडिल मला प्रत्येक गोष्टीत मदत करायचे. कोणतीही गोष्ट करताना घाबरायचं नाही, मी तुझ्या सोबत आहे, असं ते मला सांगायचे, अशी माहिती आरोपीनं चौकशी दरम्यान दिली.
चौकशीदरम्यान आरोपीनं सांगितलं, पोलीस स्टेशनला आणल्यानंतर देखील माझे वडील मला फारसं काहीच बोलले नाहीत. त्यावर आजोबा वडिलांना रागवले. तू तुझ्या मुलाशी इतकं प्रेमानं का बोलतो आहेस, त्याला इथं काही भाज्या कापल्या म्हणून आणलेलं नाही, असं आजोबा म्हणाले.
या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि त्यातून अजून तथ्य बाहेर येतील.