जबलपूर: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. अशीच एक धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथील एक रिसॉर्टमध्ये घडली होती. एका माथेफिरूने 25 वर्षांच्या तरुणीची हत्या केली होती, पण तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. मात्र, या काळात तो दररोज सोशल मीडियावर पोस्ट टाकून पोलिसांना आव्हान देत आहे. पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्याला लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय, पण तरीही त्याच्याबद्दल माहिती मिळत नाहीये. जबलपूरच्या मेखला रिसॉर्टमध्ये महिलेच्या हत्येनंतर आरोपी अभिजित पाटीदार त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून पोलिसांना सतत आव्हान देत आहे. त्याने मृत महिलेच्या आयडीवरून 5 पोस्ट आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये अभिजित म्हणतो, “बेवफाई नाही करायची.” यानंतर तो पलंगावरून एक ब्लॅंकेट उचलतो आणि त्याखाली महिलेचा मृतदेह दिसतो. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी त्याने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, “आय लव्ह यू बाबू, आपण स्वर्गात भेटू… सॉरी बाबू.”
Shraddha Walker Murder : श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबकडून झाली एक चूक, ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात!दुसर्या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिजितने आपण पाटण्यातील व्यापारी असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्याने जितेंद्र कुमार आपला बिझनेस पार्टनर असल्याचं म्हटलं होतं. अभिजितने जितेंद्रचा साथीदार सुमित पटेलचेही नाव घेतलं होतं. मृत महिलेचे जितेंद्र व सुमित या दोघांशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप त्याने केला होता. तसंच महिलेने जितेंद्रकडून सुमारे 12 लाख रुपये उसने घेतले होते आणि ती जबलपूरला पळून गेली होती. जितेंद्रच्या सांगण्यावरूनच आपण महिलेची हत्या केल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि सुमित या दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली असून, जबलपूर पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. अतिरिक्त एसपी शिवेश सिंह बघेल म्हणाले, “आम्ही सायबर टीमकडून डिटेल्स मागवले आहेत. पोस्ट टाकणारी व्यक्ती ओळखीची किंवा आरोपीही असू शकते.”
‘तोंडावर उशी दाबली, आता मेला वाटतो’ पतीचा खून केल्यानंतर पत्नीने केला प्रियकराला फोन, संपूर्ण ऑडिओ क्लिपआरोपी कधी तो पाटण्याचा तर कधी गुजरातचा असल्याचं सांगतोय. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याने फक्त या महिलेचा खूनच केला नाही तर जबलपूरमधील व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूकही केली आहे. त्याने एका टॅक्सी ऑपरेटरचीही फसवणूक केली आहे. दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर आरोपीने 5 ठिकाणं बदलली आहेत.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत. पोलीस पोहोचण्यापूर्वीच तो पळून जातोय. मात्र, या काळात तो मृत महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओही शेअर करत आहे. या आरोपीला पकडणं हे जबलपूर पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे.