JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / बॉयफ्रेंडचं लग्न झालं तरी भेटण्यासाठी दबाव टाकत होती गर्लफ्रेंड, सिराजने उचललं भयानक पाऊल

बॉयफ्रेंडचं लग्न झालं तरी भेटण्यासाठी दबाव टाकत होती गर्लफ्रेंड, सिराजने उचललं भयानक पाऊल

एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या सलमासोबत त्याचे प्रेमसंबंध होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायबरेली, 6 जानेवारी : अनैतिक संबंधातून देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. घर वाचवण्यासाठी विवाहित प्रियकराने आधीच्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केली. आरोपीची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. यानंतर दुसरे लग्न केल्यानंतरही त्याची प्रेयसी तिला भेटण्यासाठी दबाव टाकत असे. याला कंटाळून आरोपी सिराजने तिची हत्या केली. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना बछरावां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याठिकाणी 1 जानेवारी रोजी सलमा नावाच्या मुलीचा मृतदेह विहिरीतून सापडला होता. मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईलचा सीडीआर तपासला असता सिराज नावाच्या तरुणाचे नाव याप्रकरणात समोर आले. मृत सलमासोबत सिराजचे प्रेमसंबंध होते. पोलीस आपल्याला अटक करतील असा संशय सिराजला असल्याने तो पळून गेला. फरार असताना बुधवारी रात्री मारेकरी सिराज हा त्याचा मित्र मोहरम अली याच्यासोबत अल्टो कारमधून बछरावां पोलीस स्टेशन परिसरातून जात होता. यावेळी पोलिसांची नियमित तपासणी सुरू होती. पोलिसांनी दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच दोघेही गाडीतून खाली उतरले आणि पळू लागले. पाठलाग केल्यावर सिराजने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यावर दोघांच्याही पायाला गोळी लागली. पोलिसांनी चौकशी केली असता दोघेही सलमाचे मारेकरी निघाले. हेही वाचा -  Facebook वरील मुलाशी झालं प्रेम, Live-inमध्येही राहिले, पण चारित्र्यावर संशय आला अन् घडलं भयानक आरोपी सिराजने सांगितले की, एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या सलमासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. त्याच दरम्यान त्याचे एका तरुणीसोबत लग्न झाले. मात्र, लग्नानंतरही सलमाने सिराजवर भेटण्यासाठी दबाव टाकत होती. हे त्याच्या पत्नीला समजले आणि तिने सिराजसोबतचे आपले लग्न मोडले. घरच्यांनी सिराजचे दुसरे लग्न केले. मात्र, तरीही सलमा सिराजला भेटण्यासाठी दबाव टाकत होती. सलमासोबतच्या प्रेमसबंधांमुळे सिराजचे एक लग्न मोडले होते. त्यामुळे आता त्याला दुसरं लग्नही तुटण्याची भीती होती, म्हणून त्याने सलमाला मार्गातून दूर करण्याचा डाव आखला. कटाचा एक भाग म्हणून, सिराजने सलमाला नवीन वर्षाच्या दिवशी लखनऊला घेऊन जाण्यास सांगून अल्टोने लखनौला रवाना झाला. यावेळी सिराजचे साथीदार मोहरम अली आणि अनिल हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. लखनौपूर्वी बछरावां पोलीस स्टेशन परिसरात या लोकांनी आधी सलमाचा गळा दाबून खून केला आणि नंतर ब्लेडने तिचा गळा चिरून तिला विहिरीत फेकून दिले. याप्रकरणी खुनाचा खुलासा करत पोलिसांनी सिराज आणि मोहरम अली यांना अटक केली तर अनिलचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या