JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं अर्धा किलो सोनं; एअरपोर्टवर 1 तास बसवून ठेवल्यानंतर वाढला त्रास अन्..

प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं अर्धा किलो सोनं; एअरपोर्टवर 1 तास बसवून ठेवल्यानंतर वाढला त्रास अन्..

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला साधारण 1 तास बसवूनच ठेवलं. शेवटी मात्र त्यालाही त्रास सहन झाला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 जानेवारी : दुबईहून आलेल्या एका प्रवासाकडून तब्बल अर्धा किलो सोनं जप्त (Gold smuggling) करण्यात आलं आहे. जयपूर एअरपोर्टवरील (Jaipur Airport) कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. अर्धा किलो सोनं त्याने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये (रेक्टम) लपवलं होतं. विभागाला आधीच याबाबत सूचना मिळाली होती. पकडल्यानंतर तरुणाने काहीच कबुल केलं नाही. टीमनेही तब्बल एक तास तरुणाला बसवून ठेवलं. जास्त वेळ बसून राहिल्यामुळे त्याला त्रास होऊ लागला आणि त्याने स्वत:च गुन्हा कबुल केला. जप्त करण्यात आलेलं गोल्ड पेस्ट फॉर्ममध्ये होतं. प्रोसेस केल्यानंतर त्याचं वजन 512.700 ग्रॅम इतकं भरलं. याची बाजारातील किंमत साधारण साडे 25 लाख इतकी आहे. दिल्लीचा राहणारा आहे तरुण.. असिस्टेंट कमिश्नर भारत भूषण अटल यांच्या नेतृत्वात सोमवारी ही कारवाई करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, तरुण दुबईच्या स्पाइस जेट फ्लाइटने आला होता. तो दिल्लीचा राहणारा आहे. दुबईमध्ये टॅक्सी चालवतो. तपासात समोर आलं की, तरुणाला दुबई एअरपोर्टवर गोल्ड तस्करांनी 20 हजार रुपये कॅश आणि एअर तिकीटाचं आमिष दाखवलं होतं. गोल्ड जयपूरला पोहोचवायचं होतं. कॅश आणि एअर तिकीटाच्या आमिषाने तरुण हे कृत्य करण्यास तयार झाला. त्याने पेस्ट फॉर्ममधील गोल्डचे दोन कॅप्सूल आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले. हे ही वाचा- बाबांशी मोबाइलवर बोलताना मॉडेलने हॉटेलच्या गच्चीवरुन मारली उडी;झाली भयंकर अवस्था तरुण जसा जयपूर एअरपोर्टवर पोहोचले, त्याला आम्ही तपासासाठी बसवून ठेवलं. त्याची चौकशी केली. सुरुवातीला तो काहीच बोलला नाही. साधारण एका तासानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवलेल्या कॅप्सूलमुळे त्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याने स्वत:च गोल्ड आणल्याचं कबुल केलं. 2022 मध्ये गोल्ड तस्करीची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी 7 जानेवारी रोजीही कस्टम विभागाने जयपूर एअरपोर्टवर 581 ग्रॅमची 6 गोल्ड बिस्कीटं पकडली होती. ही गोल्ड बिस्किट इलेक्ट्रिक मीट ग्राइंडर मशीनमध्ये लपवून आणले होते.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या