JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 50 लाखाचं कर्ज फेडण्यासाठी 5 लाखात दिली पत्नीच्या हत्येची सुपारी; इंटरनेटवर व्हिडिओ पाहून बनवला प्लॅन

50 लाखाचं कर्ज फेडण्यासाठी 5 लाखात दिली पत्नीच्या हत्येची सुपारी; इंटरनेटवर व्हिडिओ पाहून बनवला प्लॅन

काही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने आधी पत्नीचा विमा काढला आणि नंतर ते पैसे मिळवण्यासाठी तिची हत्या करवून घेतली. पूजा असे मृत महिलेचे नाव आहे. (Man Killed Wife)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 07 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या विम्याचे पैसे हडपण्यासाठी गोळ्या घालून तिची हत्या केली. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बदरीप्रसाद मीना नावाच्या आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. गुन्हा करण्यासाठी आरोपीनी इंटरनेटची मदत घेतली. कर्ज फेडण्याचे मार्ग शोधण्यासाठी त्याने इंटरनेटवर अनेक व्हिडिओ पाहिले. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने आधी पत्नीचा विमा काढला आणि नंतर ते पैसे मिळवण्यासाठी तिची हत्या करवून घेतली. पूजा असे मृत महिलेचे नाव आहे. हा प्रकार २६ जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. भोपाळ रोडवरील माना जोड गावाजवळ पूजा मीना (२७) ही महिला पती बद्रीप्रसाद मीना (३१) याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना गोळीबार करण्यात आला. चार जणांकडून कर्ज घेतल्याचे पतीने पोलिसांना सांगितले, ते पैसे परत करण्यासाठी हे लोक सतत त्याच्यावर दबाव टाकत होते. पतीने आपल्या कथेत पोलिसांना सांगितलं की, जेव्हा तो आपल्या पत्नीसह राष्ट्रीय महामार्गावरून जात होता, त्यावेळी त्या चौघांनी त्याच्यावर हल्ला केला. महिलेच्या पतीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. Shocking! मुलाच्या वाढदिवसाच्या आनंदात हवेत गोळीबार; 3 चिमुकल्यांना लागली गोळी अन्…. यादरम्यान महिलेचा काही दिवसांपूर्वी विमा उतरवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर तपासाची दिशा बदलली आणि खुलासा झाल्यानंतर अखेर पोलिसांना मारेकरी सापडला. मारेकरी दुसरा कोणी नसून महिलेचा पतीच असल्याचे निष्पन्न झाले. विम्याच्या रकमेतून कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपीने आधी पत्नीचा विमा काढला आणि नंतर तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या पतीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुमारे 50 लाख रुपयांचे कर्ज झाल्याचे आरोपीने सांगितलं. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने आधी पत्नीचा 35 लाखांचा अपघात विमा काढला आणि नंतर इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून पत्नीला मारण्याचा कट रचला. ना सिलेंडरची गळती, ना शॉर्ट सर्किट, तरीही दुकानात झाला भीषण स्फोट, शटरही तुटले! यासाठी आरोपीने तिघांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली. एक लाख रुपये अॅडव्हान्स दिले आणि उर्वरित रक्कम विम्याच्या रकमेतून देणार असल्याचे त्याने सांगितले. खुनाच्या रात्री पतीने दुचाकी रस्त्यावर खराब झाल्याचे कारण सांगून पत्नीला रस्त्याच्या कडेला बसण्यास सांगितलं आणि दुचाकी ठीक करण्याचं नाटक करत राहिला. यादरम्यान सुपारी घेणाऱ्या आरोपींने महिलेवर मागून गोळी झाडून पळ काढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या