JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 10 लाख रुपये दे, नाहीतर अश्लिल फोटो व्हायरल करेन! SOCIAL MEDIA वरील मैत्री तरुणीला पडली महागात

10 लाख रुपये दे, नाहीतर अश्लिल फोटो व्हायरल करेन! SOCIAL MEDIA वरील मैत्री तरुणीला पडली महागात

अश्लिल फोटो (nude photos) व्हायरल (Viral) न करण्याच्या बदल्यात एक तरुण 10 लाख (10 lakh) रुपये मागून ब्लॅकमेल (Blackmail) करत असल्याची तक्रार (complaint) एका तरुणीनं पोलिसांत दाखल केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 5 सप्टेंबर : अश्लिल फोटो (nude photos) व्हायरल (Viral) न करण्याच्या बदल्यात एक तरुण 10 लाख (10 lakh) रुपये मागून ब्लॅकमेल (Blackmail) करत असल्याची तक्रार (complaint) एका तरुणीनं पोलिसांत दाखल केली आहे. या तरुणानं तरुणीचे काही अश्लिल फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअप ग्रुपवरून व्हायरल करण्याची धमकी दिली. फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील, तर 10 लाख रुपये खंडणी देण्याची मागणीही त्याने केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. अशी झाली ओळख रांचीमधील 24 वर्षांच्या तरुणीची शफीक अन्सारी नावाच्या तरुणाशी सोशल मीडियावर ओळख झाली. हळूहळू ही ओळख मैत्रीत परिवर्तीत झाली आणि त्या दोघांनी प्रत्यक्ष भेटायला सुरुवात केली. भेटीच्या वेळी ते दोघंही एकमेकांना आपला फोन देत असत आणि त्याचा गैरफायदा घेत तरुणीच्या मोबाईलमधले तिचे काही फोटो आणि व्हिडिओ तरुणाने स्वतःकडे घेतले. फोटो मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. फोटोशॉपचा वापर करून आपले मूळ फोटो बदलून अश्लिल फोटो आणि व्हिडिओ या तरुणानं तयार केल्याचा आरोप तरुणीनं केला आहे. शफीकनं तरुणीची ओळख असणाऱ्या काही ग्रुपमध्ये हे फोटो टाकायला सुरुवात केली. त्या ग्रुपमधील ओळखीच्या सदस्यांकडून जेव्हा तरुणीला ही गोष्ट समजली तेव्हा तिला जबर धक्का बसला. हे वाचा - अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पोलिसाला बेदम चोप, पाहा VIDEO तिने फोन करून शफीकला याचा जाब विचारला. मात्र त्यावेळी शफीकचा नूरच बदललेला होता. त्याने तिला थेट जीवे मारण्याची आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या फोटोंच्या बदल्यात 10 लाख रुपये देण्याची मागणी त्याने तरुणीकडे केली. त्यानंतर तरुणीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. लवकरच तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई  केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या