इंदूर, 4 मे : इंदूरच्या आझाद नगरमध्ये राहणाऱ्या विष्णू चौहान नावाच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. मृत हा व्यवसायाने चित्रकार (Painter) होता. पोलिसांना मृताच्या खिशातून सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्याने स्वत:वर कर्जबाजारी झाल्याचा तसेच विवाहित प्रेयसी व कुटुंबीयांकडून छळ होत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. वास्तविक, मंगळवारी संध्याकाळी विष्णू चौहान यांना त्यांच्या पत्नीने खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहिले होते. त्यांनी घाईघाईने शेजाऱ्याच्या मदतीने विष्णू यांना खाली उतरवले आणि एमवाय हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन तो सील केला. यासोबतच मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवण्यात आला. सुसाईड नोट मिळाली - तत्पूर्वी, झडतीदरम्यान पोलिसांना सुसाईड नोटही सापडली होती. यामध्ये मृताने प्रेयसीमुळे त्रास होत असल्याचे नमूद केले होते. त्याने लिहिले की, ‘मी विष्णू चौहान आहे, आत्महत्या करत आहे. बिचोली मर्दाना येथे राहणारी माझी मैत्रीण रीना हिने तीन वर्षे माझा वापर केला. तिचा भाऊ माझ्या 13 वर्षांच्या मुलीला घेऊन गेला आणि गेल्या 1 वर्षापासून तो तिला गावात ठेवतोय. रीनाने मला प्रेमाच्या नादात डांबून कोणतीही कायदेशीर कारवाई करू दिली नाही. आता तिला तिचा सन्मान आठवला आहे. या कटात रीना मालवी, तिचा पती सुरेश मालवी, भाऊ दिनेश, राधे आणि करण, तिचे आई-वडील धर्माबाई आणि आत्माराम यांचा सहभाग आहे. त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मला सुनील अंडा यांना व्याजासह 1.25 लाख रुपये द्यायचे आहेत. माझे घर विकून त्याला हे पैसे द्यावे. मी सरकारला विनंती करतो की माझ्या वडिलांना आणि पत्नीला कोणताही त्रास देऊ नये.’ हेही वाचा - …म्हणून प्रेयसीसाठी मित्रावर झाडली गोळी, NRI च्या खुनाचे गूढ उकलले
तर याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटचीही तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मृताच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. यात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.