JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीच्या त्रासाला इतका कंटाळला की उचललं टोकाचं पाऊल; आधी व्हिडिओ बनवला अन् मग...

पत्नीच्या त्रासाला इतका कंटाळला की उचललं टोकाचं पाऊल; आधी व्हिडिओ बनवला अन् मग...

25 वर्षीय मृत मनीश कुमार याच्या वडिलांनी माहिती दिली, की त्यांच्या मुलाचं लग्न सहा वर्षांपूर्वी शीशगड येथील भूरी नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. 3 दिवसांपूर्वी तो आपल्या पत्नीच्या माहेरी गेला होता

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 02 डिसेंबर : आत्महत्येची एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. यात एका तरुणाने अतिशय धक्कादायक कारणामुळे हे पाऊल उचललं. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओही बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होता. याच कारणामुळे त्याने हे पाऊल उचललं. पगार मागितल्यानं मालकाला राग अनावर; कामगारासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांकडून आरोपीचा शोध घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय मृत मनीश कुमार याच्या वडिलांनी माहिती दिली, की त्यांच्या मुलाचं लग्न सहा वर्षांपूर्वी शीशगड येथील भूरी नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. 3 दिवसांपूर्वी तो आपल्या पत्नीच्या माहेरी गेला होता. इथेच त्याचं पत्नी आणि मेहुण्यांसोबत भांडण झालं. यात त्यांनी तरुणाला मारहाण केली. इतकंच नाही तर त्याच्याकडील दुचाकीही घेतली आणि त्याला हाकलून दिलं. या घटनेमुळे व्यथित होऊन मनीशने घरी येऊन गळफास घेतला. फाशी घेण्यापूर्वी त्याने व्हिडीओ बनवून सासरच्या मंडळींना कंटाळून फाशी घेत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर वडिलांची इज्जत वाचवण्यासाठी खूप काही करावं लागतं, असंही तो म्हणाला. याप्रकरणी मयताच्या कुटुंबीयांनी त्याच्या पत्नीसह मेहुण्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि… VIDEO याप्रकरणी एसएसपी अखिलेश कुमार चौरसिया यांनी सांगितलं की, मीरगंजमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा व्हिडिओ हाती लागला आहे. जो त्याने आत्महत्येपूर्वी बनवला होता. ज्यामध्ये त्याने सांगितलं की त्याची पत्नी त्याला खूप त्रास देते. वेळोवेळी त्याचा अपमान करते. त्यामुळे तो गळफास घेऊन आत्महत्या करत आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे. भादंवि 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या