JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / अजब चोरीची गजब कहाणी! 3 दुकानं फोडली पण चोरले फक्त 20 रुपये; कारणही विचित्र

अजब चोरीची गजब कहाणी! 3 दुकानं फोडली पण चोरले फक्त 20 रुपये; कारणही विचित्र

चोरीचं असं विचित्र प्रकरण पाहून पोलीसही हैराण झाले.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 31 मार्च : चोरीच्या घटना तुमच्यासाठी नव्या नाहीत. चोरीची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आपल्या आजूबाजूला किंवा बातम्यांमधून चोरीच्या घटना कानावर पडतात. पण सध्या एका चोरीची सर्वात जास्त चर्चा आहे. याचं कारणही तसंच आहे. ज्या कारणासाठी चोरी करण्यात आली आहे आणि जितकी चोरी करण्यात आली आहे, दोन्हीही विचित्र आहे (Man broke 3 shops locks steals only 20 rupees). सामान्यपणे कोणताही चोर चोरी करतो तर एका डावात मोठ्या मालावर डाव साधण्याचा प्रयत्न करतो. आता जर एखाद्या चोरट्याने तीन दुकानं फोडली तर त्याने किती तरी मोठी चोरी केली असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका चोरट्याने तीन दुकानं फोडून फक्त 20 रुपयांचीच चोरी केली आहे. चोरीचं कारणही तितकंच विचित्र आहे. ही चोरी चक्क कुरकुऱ्यांसाठी करण्यात आली आहे. हे वाचा -  पालकांनो, लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? चिंता नको; अशा पद्धतीनं सोडवा पाल्यांची सवय; वाचा टिप्स राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील फतेहपूरमधील परिसरातील ही विचित्र चोरी आहे.  इथल्या काही दुकानांचे टाळे तुटलेले दिसलं. व्यापाऱ्यांनी सकाळी पाहिलं तर त्यांना चोरी झालेलं पाहून धक्काच बसला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ते चोरापर्यंत पोहोचले. त्यांनी चोराच्या मुसक्या आवळल्या.  पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा तेसुद्धा हैराण झाले. आसिफ असं या चोरट्याचं नाव. त्याने एकाच रात्री तीन वेगवेगळ्या दुकानाची टाळं फोडली. त्याने फक्त 20 रुपये चोरले होते कारण त्याला कुरकुरे खायचे होते. हे वाचा -  मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने सुरू केलं भलतंच काम; हजारो नाणी घेऊन स्कूटी खरेदीसाठी पोहोचला तरुण ही व्यक्ती मानसिक परिस्थिती ठिक नसल्याचं सांगितलं जातं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  एबीपी च्या वृत्तानुसार पोलीस उपनिरीक्षक उदय सिंह यांनी सांगितलं की, त्याला काही विचारलं तरी तो नीट सांगू शकत नाही. तो नीट बोलू शकत नाही. त्याने एकाच रात्री तीन दुकानांचं टाळं तोडल्याचं सांगितलं. त्याला उपचाराची गरज आहे. आता त्याच्या घरातल्यांना बोलवून त्याच्यावर उपचार केले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या