JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 155 महिलांना डेट करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये लुटले; अखेर Romance Scammer ला मिळालं कर्माचं फळ

155 महिलांना डेट करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये लुटले; अखेर Romance Scammer ला मिळालं कर्माचं फळ

. तो डेटिंग साइट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधायचा आणि नंतर त्यांची फसवणूक करायचा.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 डिसेंबर : कधीकधी असे लोक पोलिसांच्या हाती लागतात जे महिलांची फसवणूक करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशाच एका व्यक्तीची अजब कहाणी समोर आली आहे. जो केवळ महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत नव्हता तर त्यांचे पैसे घेऊन पळूनही जात असे. एकूण 155 महिलांकडून त्याने तब्बल 4 कोटी रुपये घेतले होते. पतीला तुरुंगात पाठवून प्रियकरासोबत फरार झाली 5 मुलांची आई; संपूर्ण कांड जाणून व्हाल शॉक हे प्रकरण अमेरिकेतील न्यू जर्सी येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो ऑनलाइन महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून पैसे गोळा करत असे. त्याला ‘रोमान्स स्कॅमर’ असं नाव देण्यात आलं आहे. तो डेटिंग साइट्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधायचा आणि नंतर त्यांची फसवणूक करायचा. एवढंच नाही तर तो या महिलांकडे पैशांची मागणी करायचा आणि त्यांना हे पैसे परतही करत नसे. आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपीला एवढा आत्मविश्वास होता की त्याला वाटायचं तो कधी पकडलाच जाणार नाही. पण याआधीही तो एकदा पकडला गेला होता. मात्र यावेळी आरोपी पॅट्रिक गिब्लिन याला न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारीच ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाढदिवसाचा तो फोटो मुंबईतील अल्पवयीन मुलीसाठी ठरला संकट, मित्रानेच ब्लॅकमेल करत केलं किळसवाणं कृत्य तो विधवा, अपंग महिला आणि इतर एकल मातांनाही अडकवायचा, असा उल्लेख मीडिया रिपोर्ट्समध्ये आहे. अनेकवेळा तो स्वत:ला न्यायाधीशाचा मुलगा म्हणवत असे तर कधी स्वत:ला अधिकारी म्हणवून घेत असे. आपल्या या कृत्यासाठी आता त्याला शिक्षा मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या