JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / जमीन अन् बहीण यात भावाने केली निवड; जीव जाईपर्यंत स्वत:च्या ताईवर करीत राहिला वार

जमीन अन् बहीण यात भावाने केली निवड; जीव जाईपर्यंत स्वत:च्या ताईवर करीत राहिला वार

सख्ख्या भावाने सकाळी झोपेतच बहिणीची हत्या केली, या घटनेनंतर तो फरारही झाला.

जाहिरात

(प्रातिनिधीक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 16 जून : सीतापुरच्या (Sitapur) सराय युसूफ गावात या एका वृत्तामुळे (Uttar Pradesh News) खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून (Land Dispute) एका भावाने आपल्या बहिणीचा धारदार शस्त्राने हल्ला (Killed Sister) करी त हत्या केली. (Brother Murdered Sister). यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करीत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. झोपेत असताना बहिणीवर केला हल्ला.. जिल्ह्याच्या खैराबाद भागात सराय युसूफ गावातून ही घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी सहा वाजता घडली. येथे महेश यादव नावाच्या गावकऱ्याची मुलगी प्रीती खोलीच्या गच्चीवर झोपली होती. तिचा भाऊ सोनू अचानक धारदार हत्यार घेऊन गच्चीवर गेला आणि झोपलेल्या बहिणीवर हल्ला केला. बहिणीचा मृत्यू होत नाही तोवर तो तिच्यावर वार करीत होता. जमिनीच्या वादावरुन नाराज होता.. गावकऱ्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी महेश यादव याने आपल्या मुलीचं लग्न ठरवलं होतं. तो स्वत:ची जमीन विकून मुलीचं लग्न लावून देणार होता. जमीन विकण्यावर सोनूने विरोध केला होता. यावरुन त्याचा बहीण आणि वडिलांमध्ये वाद झाला. व्यवसायाने शेतकरी असलेल्या सोनूने जमीन न विकण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचे वडील आणि बहीण काहीच ऐकण्यास तयार नव्हते. आपल्या बहिणीची हत्या केल्यानंतर सोनू घटनास्थळाहून फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या