सुरत, 16 मे : गुजरातमधील सुरतमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील मानसरोवर तलावाजवळ राहणाऱ्या पांडे कुटुंबीयांवर काल रात्री छोट्याशा वादातून शेजारच्यांनी चाकू हल्ला केल्याचं समोर आलं आहे. यावेळी भांडण सोडविण्यासाठी मध्ये येणारा एक तरुणदेखील जखमी झाला आहे. पोलिसांनी शेजारच्यांवर गुन्हा दाखल करीत कारवाई सुरू केली आहे. श्रवण कमलाशंकर दया शंकर पांडे, पत्नी शशी, पिता कमलाशंकर आणि हितेश पाठक यांच्यावर काल रात्री शेजारी राहणारे सुनील मोहन, दिव्या मोहन, आलोक सुनील, सागर हेक्सन यांनी हल्ला केला होता. शेजारच्यांनी श्रमणच्या वडिलांवर हल्ला केला. त्याशिवाय श्रवणच्या मानेवर, माथ्यावर सुऱ्याने हल्ला करण्यात आला. याशिवाय पत्नी शशी हिच्या गळ्याभोवती व हातावर चाकूने हल्ला केला होता. पीडित कुटुंबाने सांगितलं की, वडील बाल्कनीत बसले होते. दुसरीकडे डिव्हाडरवरुन उडी मारून मुलगा येत होता. तेव्हा मुलाचे आई-वडील चार ते पाच लोकांसह त्याच्या घरी पोहोचले आणि दरवाजा उघडताच मारायला सुरुवात केली. कुटुंबातील तीन सदस्य आणि एका बचाव दलाने तेव्हा ब्लेडने मानेवर वार केले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
हे ही वाचा- नवरीच्या घरात सुरू होती लग्नाची धावपळ; 2 नवरदेवांच्या वराती पाहून वऱ्हाडी शॉक जखमी कुटुंबाला तत्काळ उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात पाठवलं आहे. यानंतर हल्ला करणाऱ्या कुटुंबाविरोधात तपास करण्यास सुरुवात केली आहे. श्रवणकुमार पांडेय मिलमध्ये काम करतात आणि इलाहाबादमध्ये राहतात. हल्ल्यात त्यांची पत्नी शशिबेन, वडील कमला शंकर आणि वाचविण्यासाठी आलेला रितेश नावाचा तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.