विजयपुरा (कर्नाटक), 24 ऑक्टोबर : कर्नाटकातील विजयपुरामध्ये हिंदू-मुस्लिम प्रेमातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या मुलीशी कथित प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एका हिंदू तरुणाची हत्या (Hindu youth murder) करून त्याचा मृतदेह गावातील शेतातील विहिरीत फेकून दिला. पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 34 वर्षीय रवी निंबर्गी 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता आणि दुसऱ्या दिवशी तरुणाच्या कुटुंबाने तक्रार केली की त्याची हत्या मुस्लीम मुलीच्या नातेवाईकांनी (murder news) केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 3 पथकं रवाना केली आहेत. हे वाचा - 3 महिन्याच्या बहिणीचा गळा दाबून अल्पवयीन भावाने मृतदेह पिशवीत टाकून नदीत फेकला पथके तयार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी विजयपुरा जिल्ह्यातील बालगानूर गावातील एका विहिरीतून रवीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मुलीच्या भावाला, तिच्या एका नातेवाईकाला खून, गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रवीचे नातेवाईक शशिधर यांनी पत्रकारांना सांगितले की, तरुण आणि तरुणीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते म्हणाले की आरोपी आणि इतर नातेवाईकांनी या जोडप्याला अनेक वेळा गंभीर परिणामांची धमकी दिली होती.