लॉटरीमुळे सापडला अट्टल गुन्हेगार
विनय दुबे, प्रतिनिधी मुंबई, 15 जुलै : कायद्याचे हात लांब असतात अशी म्हण प्रसिद्ध आहेत. काही गुन्हेगार वर्षांमागून वर्षे जातात तरी हाती लागत नाहीत. मात्र, एक ना एक दिवस ते कचाट्यात येतात. अशीच एक गुन्हेगाराची घटना मुंबईतून समोर आली आहे. एक हत्येतील आरोपी गेल्या सात वर्षांपासून फरार होता. पोलिसांनी जंगजंग पछाडून देखील त्याचा मागमूस नव्हता. पण, म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादी चूक करतोच. या आरोपीनेही तेच केलं. लॉटरी घेण्यासाठी आला अन् पोलिसांच्या सापळ्यात सापडला. काय आहे प्रकरण? मुंबईचा कांदिवली परिसरात 2015 मध्ये आपसातील वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गेली 7 वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. पण एका लॉटरीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून आरोपी कांदिवली परिसरात एसआरएची लॉटरी घेण्यासाठी आला असता कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अजय कुराडे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करुन पोलिसांनी पुन्हा त्याची कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. वाचा - प्रेमासाठी परदेशातून भारतात आली, मात्र इथं मिळाला आयुष्याचा सर्वात मोठा धोका आयफोनसाठी एक्स-गर्लफ्रेंडचं अपहरण 26 वर्षांच्या एका तरुणाने आयफोनच्या मोहापायी त्याच्या 19 वर्षांच्या एक्स-गर्लफ्रेंडचं अपहरण केलं. त्यानंतर या मुलीला सोडण्यासाठी तिच्या आईकडे आयफोन किंवा दीड लाख रुपये देण्याची मागणी केली; पण या तरुणाचा प्लॅन फसला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने बुधवारी (12 जुलै) गोल्डन नेक्स्ट परिसरातून एका किशोरवयीन मुलाचे अपहरण केलं आणि तिच्या मोबाइलवरून तिच्या आईला फोन करून खंडणी म्हणून आयफोन किंवा रोख दीड लाख रुपये देण्याची मागणी केली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही गोष्टींचा खुलासा झाला. तपासादरम्यान असं दिसून आलं, आरोपी आणि पीडित महिलेची जानेवारीत भेट झाली होती आणि या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं; मात्र संबंधित व्यक्ती आधीच विवाहित असल्याचं समजल्यावर पीडित महिलेने त्याला भेटणं बंद केलं होतं. यावरून संतापलेल्या या व्यक्तीने काही खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला भेटण्यास भाग पाडलं. यामुळे घाबरून ती त्याला एक ते दोन वेळा भेटली असं समोर आलं आहे.